ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांनाच एक वेलफिटेड आणि स्वस्थ शरीर हवं असतं.
यासाठी अनेकजण डाएटींग आणि व्यायाम करत असतात.
काही असे कडधान्य आहेत जे भिजवून खाल्ल्याने जलद गतीने वजन कमी करण्यास मदत होते.
भिजवलेले मूग पचायला हलके आणि फायबरने भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
भिजवलेल्या मटकीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी भिजवलेले चणे हा एक उत्तम पर्याय आहे. चणे प्रथिनांचा चांगला स्त्रोत मानले जातात.
वाटाणा आणि मसूर भिजवलेले वाटाणा आणि मसूर मटकीप्रमाणेच फायबर आणि प्रथिनांनी भरपूर असतात.
कडधान्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी आहारात त्यांचा समावेश करणे अगदी योग्य ठरेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.