ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आरोग्यासाठी काहीवेळा डॉक्टर तेल बियांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
भोपळ्याच्या बियाही त्यतीलच काही पौष्टिक सुपरफूडपैकी एक आहे.
यामध्ये मोठ्याप्रमाणात उपयुक्त चरबी, फायबर, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
भोपळ्याच्या बिया शरिराच्या संपूर्ण आरोग्यासाठी खुपच उपयोगी मानले जातात.
यामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
यातील मॅग्नेशियम हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे काम करतं.
रक्तदाब नियंत्रित राहिल्याने हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.
भोपळ्याच्या बियांधील ट्रिप्टोफॅन नावाचा अमीनो अॅसीड शरिरातील सेरोटोनिनला गुड-हार्मोनमध्ये रूपांतरीत करतो.
यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. स्ट्रेस कमी होतो. झोप चांगली लागते.
डायबीटीज किंवा प्री-डायबिटीक लोकांसाठी एक उत्तम स्नॅक आहे.