Protect Yourself COVID Office saam tv
लाईफस्टाईल

Corona: ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी COVID-19 पासून कसा करावा बचाव? या गोष्टी अवश्य पाळा

COVID-19 Prevention Tips : सध्या देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यामुळे सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. यामघ्ये सार्वजनिक वाहतुकीमुळे आणि गर्दीत असल्याने ऑफिसला जाणाऱ्या लोकांना जास्त धोका असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

5 वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. यावेळी या एका व्हायरसने संपूर्ण जगाला त्यांच्या घरातच राहण्यास भाग पाडलं. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या व्हायरसचा एक नवा प्रकार समोर आला आहे. या संसर्गाची प्रकरणं वेगाने वाढत असून भारत सरकारच्या COVID-19 डॅशबोर्डनुसार, २६ मे पर्यंत भारतात कोरोनाचे १०१० रुग्ण आढळले आहेत.

सध्या जरी ही परिस्थिती आता नियंत्रणात असली तरीही अशा परिस्थितीत थोडासाही निष्काळजीपणा आपल्या सर्वांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे कोविड-१९ संसर्गापासून बचाव करण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कोरोना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरू शकतो. यामध्ये ऑफिसला जाणाऱ्या लोकांना अनेकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागतो. अशावेळी ऑफिसमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी काय आहेत ते पाहूयात.

ऑफिसला जाणाऱ्या लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी काय करावं?

वॅक्सिन

कोविडच्या साथीच्या काळात प्रत्येकाने लस घेतली. त्यावेळी कोरोनाच्या लसीचे एकूण तीन डोस आले होते. मात्र काही कारणामुळे जर तु्म्ही कोरोनाची लस घेतली नसेल तर उच्च धोका असलेल्या लोकांना, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्यांना देखील बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

अंतर ठेवा

कोरोना टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अंतर ठेवणं. यावेळी लोकांपासून सुमारे एक मीटर अंतर राखणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक आजारी व्यक्ती नसल्या तरीही तरी अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

मास्कचा वापर

जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर नक्कीच मास्क घाला. यावेळी शक्यतो एन-९५ मास्कचा वापर करा. जेणेकरून बाजूंनी हवा थेट आत येणार नाही. वापरलेल्या मास्कचीही काळजी घ्या. यावेळी मास्क काढा आणि स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. जर मास्क धुण्यायोग्य असेल तर तो दररोज धुवा.

हात साफ ठेवा

साबण आणि पाण्याने हात पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे हात धुणे कठीण असेल, तर सॅनिटायझर सोबत ठेवा आणि त्याद्वारे तुमचे हात स्वच्छ करा. जेवण्यापूर्वी किंवा तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा.

चेहऱ्याला सतत हात लावू नका

जर तुमचे हात स्वच्छ नसतील तर तुमचे डोळे, नाक आणि तोंड यांना अजिबात स्पर्श करू नका.

लक्षणं ओळखा

कोविड-१९ ची सामान्य लक्षणं जसं की, ताप, खोकला, थकवा आणि चव किंवा वास कमी होणं हे त्रास जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. लक्षणं दिसल्यापासून पुढील १० दिवस वेगळे राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT