Liver Disease Symptoms: नखं पाहून ओळखा लिव्हरचे आजार; चुकूनही लक्षणांना इग्नोर करू नका

Liver Disease Symptoms: नखांमध्ये दिसणारे छोटे बदल लिव्हरच्या आरोग्याचं लक्षण असू शकतं. नखांवरून लिव्हरची परिस्थिती स्थिती कशी ओळखता येते हे या आर्टिकलमधून जाणून घेऊया.
Liver Disease Symptoms
Liver Disease Symptomssaam tv
Published On

सुंदर दिसायचं असेल तर आपण आपल्या नखांवरही मेहनत घेतो. मात्र कधी तुम्ही तुमच्या नखांवर नीट लक्ष दिलंय का? याचं कारण म्हणजे तुमची नखं तुमच्या आरोग्याबाबत देखील माहिती देतात. यामध्ये खासकरून तुमची नख तुमच्या लिव्हरबाबत माहिती देतात. यकृत म्हणजेच लिव्हर शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे आणि त्यामध्ये झालेल्या बिघाडाची लक्षणं तुमच्या नखांवरून स्पष्टपणे दिसून येतात.

ज्यावेळी तुमचं लिव्हर योग्य पद्धतीने काम करत नाही तेव्हा त्याची लक्षणं त्वचा, डोळे आणि नखांवर दिसून येतात. जर तुमच्या नखांमध्ये विचित्र बदल दिसून येतात तेव्हा त्या्कडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. नखांवर यावेळी कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

लिव्हर खराब झाल्याची लक्षणं

नखं पांढरी पडणं

जर तुमच्या नखांचा रंग पिवळा किंवा पांढरा होऊ लागला तर ते लिव्हरच्या सिरोसिसचं लक्षण मानलं जातं. ही एक गंभीर यकृताची परिस्थिती आहे ज्यामध्ये लिव्हरच्या पेशी हळूहळू खराब होऊ लागतात.

Liver Disease Symptoms
Morning Walk Dangers : तुमचा मॉर्निंग वॉक ठरू शकतो जीवघेणा; 90% लोकं करतात या चुका

नखं तुटू लागणं

जर तुमची नखं सहजपणे तुटत असतील तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जर तुमची नख कमकुवत होऊन ती सहजपणे तुटत असतील तर तुमच्या यकृतामध्ये समस्या असल्याचं हे लक्षण आहे.

नखांवर काळे डाग

नखं काहीशी काळी प़णं हे हिपॅटायटीस बी किंवा सी चे लक्षण असू शकतं. हे लिव्हरच्या इन्फेक्शनशी संबंधित आहे.

नखांचा रंग पिवळा होणं

जर नखांचा रंग अधिकच पिवळा किंवा तपकिरी होत असेल तर ते पित्त निर्मितीतील अडथळ्याचे लक्षण असू शकतं. ही समस्या देखील लिव्हरशी संबंधित आहे.

Liver Disease Symptoms
Blood Vein Color: रक्ताचा रंग लाल, मग नसा का हिरव्या-निळ्या दिसतात? जाणून घ्या यामागील विज्ञान

नखांच्या खाली सूज येणं

नखांच्या खालील भागाला सूज आली असेल तर ते हेपेटायटीसचं लक्षण असू शकतं. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

Liver Disease Symptoms
Hypertension Effect on Heart : उच्च रक्तदाबाचा हृदयावर तुमच्या हृदयावर कसा होता घातक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपाय

  • भरपूर पाणी पिऊन हायड्रेट राहा

  • जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाऊ नका

  • दररोज आहारात हिरव्या भाजांचा समावेश करा

  • नियमित व्यायाम करा

  • वेळोवेळी लिव्हरची टेस्ट करून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com