Prostate Cancer Case Saam TV
लाईफस्टाईल

Prostate Cancer Case : भारतातील पुरुषांमध्ये प्रायव्हेट पार्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ; ही लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या

Prostate Cancer Symptoms: डॉ. गुप्ता यांनी पुढे म्हटलं की अमेरिकेमध्ये ८० टक्के व्यक्ती प्रोस्टेट कर्करोगातून बऱ्या झाल्या आहेत. मात्र भारतात हा आकडा अगदी उलट आहे.

Ruchika Jadhav

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा जीवघेना आजार आहे. हा कॅन्सर झाल्यानंतर पुरुषांचा मृत्यू होतो. आतापर्यंत हा आजार ५० वर्षांहून अधिक व्यक्तींना व्हायचा. मात्र नुकत्याच एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की हा कॅन्सर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना देखील होत आहे. दिल्ली यूनिक हॉस्पिटल कॅन्सर सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष गुप्ता यांनी याबाबत माहिती सांगितली आहे.

WHO ने सांगितलेल्या आरडेवारीनुसार, साल २०२२ मध्ये भारतात ३७,९४८ प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण होते. या वर्षी १४ लाख नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी देशाच्या तुलनेत ३ टक्के इतकी आहे. या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीलाच समजली तर मृत्यूचा धोका फार कमी असतो, असं डॉ.गुप्ता यांनी सांगितलं आहे.

डॉ. गुप्ता यांनी पुढे म्हटलं की अमेरिकेमध्ये ८० टक्के व्यक्ती प्रोस्टेट कर्करोगातून बऱ्या झाल्या आहेत. मात्र भारतात हा आकडा अगदी उलट आहे. येथे झटपट रोगाचे निदान होत नाही.

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे

लघवी करताना त्रास होणे

वारंवार लघवी येणे

रात्री सतत लघवी येणे

लघवी करताना रक्तस्त्रव होणे

लघवी केल्यानंतर पाठ आणि ओटीपोटात वेदना

डॉक्टरांनी पुढे या रोगापासून स्वत:ला दूर कसे ठेवावे याची देखील माहिती सांगितली आहे. त्यांनी म्हटलं की, या रोगापासून वाचण्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेतली पाहिजे. ६ महिन्यातून एकदा तरी बॉडी चेकअप केलं पाहिजे. तसेच यातील एकही सौम्य लक्षण जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना घेतलं ताब्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT