Thursday Remedy saam tv
लाईफस्टाईल

Guruwar che Upay: अडचणी दूर होणार, हाती पैसा येणार; गुरुवारी भगवान विष्णूंसाठी हे उपाय अवश्य करा

Thursday Remedy: आज गुरुवार असून दर गुरुवारी काही सोप्या उपायांचा अवलंब करणं फायद्याचं मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळण्यास मदत होते. या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. मात्र यामध्ये गुरुवारचा दिवस खूप खास मानला गेला आहे. या दिवशी भगवान विष्णुंची आणि देवगुरु बृहस्पतिंची पुजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी यांची पुजा केल्याने तुमच्या आयुष्यात सगळी कामं चांगली होतात.

गुरुवारी केलेली साधना जीवनात आनंद आणते, असं मानलं जातं. विशेषत: जर एखाद्याला आर्थिक समस्या किंवा प्रगतीत अडथळा जाणवत असेल या दिवशी काही उपाय करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. या दिवशी सकारात्मक विचार, योग्य आहार आणि छोटे छोटे उपाय तुमचे नशीब उजळवू शकतात.

गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय करावेत

गायीला डाळ आणि गूळ खायला द्या

गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळ करून गायीला हरभरा डाळ आणि गूळ खायला दिला पाहिजे. हा उपाय केल्याने घरात आशीर्वाद येतो. त्याचप्रमाणे तुमची रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतात.

हळद आणि गंगेचं पाणी

आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी भरपूर पाणी घेऊन त्यात थोडी हळद आणि गंगाजल घातलं पाहिजे. नंतर घराच्या मुख्य दारात आणि कोपऱ्यात शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

केशर आणि हळदीचं दूध

गुरुवारी सकाळी आंघोळ करून केशर मिश्रित दूध पिणं हे शुभ मानलं जातं. यावेळी केशर नसेल तर हळदीच्या दूधाचंही सेवन करू शकता. यामुळे शरीरात ऊर्जा येते. यामध्ये अजून एक उपाय म्हणजे एका लोटा दुधात केशर मिसळून शिवलिंगावर अर्पण करू शकता.

मंत्राचा जप करा

गुरुवारच्या दिवशी छान स्वच्छ आंघोळ करा. यावेळी शांत मनाने मंत्राचा 108 वेळा जप करा - "ॐ क्लें बृहस्पतये नम:" या मंत्रामुळे गुरू ग्रह बळकट होण्यास मदत होते. याशिवाय अभ्यास, करिअर आणि लग्नाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT