प्रेमानंद महाराजांनी सांगितलं थंड पाण्याने आंघोळ करण्याचं अध्यात्मिक कारण
थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुधारत असल्याचे त्यांनी सांगितलं
ब्रह्मचर्य म्हणजे शरीरातील ऊर्जा योग्य दिशेने वापरणे, असे त्यांनी सांगितलं
लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. माणूस दिवसभरातील प्रत्येक कार्यात आरामदायी मार्ग शोधू लागला आहे. दररोजच्या कामात सुखावणाऱ्या गोष्टीकडे आकर्षित होऊ लागला आहे. आता आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी गिझर वापरू लागला आहे. आता या गिझरच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत पाणी गरम होते. मात्र, आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे का, यावर प्रेमानंद महाराज यांनी भाष्य केलं आहे.
प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं की, तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर तुम्ही कमकुवत व्हाल. तुम्ही सुख-सुविधाचा लाभ घ्याल, मात्र, तुम्ही सहनशक्ती आणि आंतरिक शक्ती कमी होईल. गरम पाण्याने शरीराला आराम मिळतो. परंतु तुमची शरीरातील ऊर्जा हळू हळू कमी होत जाते. तुम्ही थंडीने घाबरू लागता, त्यावेळी तुमचं शरीर आणि मन हळूहळू नाजूक होत जातं'.
प्रेमानंद महाराजांनी पुढे सांगितलं की, 'माणसाने आयुष्यात संतुलन ठेवलं पाहिजे. घाबरुन पळून जाऊ नये. जे थंड पाण्याने आंघोळ करतात, त्यांचं शरीर थंडीचा सामना करायला शिकतं. यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. माणूस मानसिकदृष्ट्या देखील बलवान होतो. ही शक्ती ब्रम्हचर्याच्या पालनासाठी आवश्यका आहे'.
'ब्रम्हचर्य केवळ लैंगिक संबंधावर नियंत्रण नव्हे, तर तुमची ऊर्जा चांगली दिशेने लावणे. यामुळे शरीर दृढ आणि मनावर संयम राखता येतो. त्यावेळी व्यक्तीला दैनंदिन कार्यावर लक्ष केंद्रीत करता येते'.
शेवटी प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं की, 'जो व्यक्ती आरामापेक्षा अधिक सहनशक्तीला महत्व दिलं जातं, तोच व्यक्ती ब्रह्मचर्याच्या मार्गावर पुढे जातात. थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. त्यामुळे मनुष्य मजबूत होतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.