Premanand Maharaj Saam Tv
लाईफस्टाईल

Premanand Maharaj: प्रसाद, नैवद्य करताना केस अथवा किटक पडला, काय कराल? प्रेमानंद महाराजांनी दिला महत्वाचा सल्ला

Premanand Maharaj Advice: देवासाठी प्रसाद तयार करताना केस किंवा कीटक पडल्यास तो प्रसाद पुन्हा तयार करावा. नैवेद्य शुद्ध आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Manasvi Choudhary

वृंदावनातील संत श्री प्रेमानंद महाराज हे संपूर्ण देशभरात लोकप्रिय नाव आहे. अनेक सेलिब्रिटीपासून ते राजकीय मंडळी त्यांची भेट घेतात. वृंदावनातील श्री राधा हित केली कुंज आश्रमात प्रेमानंद महाराज राहतात. दररोज ५० ते ६० भक्तांशी ते संवाद साधतात. महाराजजी त्यांच्या प्रवचनांद्वारे लाखो लोकांना मार्गदर्शन करतात. या संभाषणादरम्यान, भक्त त्यांना अध्यात्म आणि वैयक्तिक जीवनाबद्दल प्रश्न विचारतात आणि प्रेमानंद महाराज त्यांची उत्तर बिनधास्तपणे देतात.

दरम्यान नुकताच एका भक्ताने, महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराजी जर देवाला प्रसाद बनवताना चुकून त्यामध्ये केस किंवा माशी त्यात पडली तर प्रसाद पुन्हा तयार करावा लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, देवासाठी प्रसाद तयार करताना जर चुकून केस किंवा कीटक त्यात पडला तर प्रसाद पुन्हा बनवावा लागेल.

म्हणूनच नैवेद्य तयार करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. महाराज पुढे म्हणाले, "अन्न तयार करताना, तुमचे केस बांधा. तसेच, केस किंवा इतर कीटक किंवा डास अन्नात पडू नयेत याची काळजी घ्या." जेवण बनवताना जास्त गप्पा मारणे टाळावे कारण त्यामुळे जेवणात लाळ पडू शकते. देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT