Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

Actor Struggle: प्रसिद्ध भाजी विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
Tamil actor Vimal spotted selling vegetables
Tamil actor Vimal spotted selling vegetablesSaam Tv
Published On

Actor Struggle: तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता विमल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. विमलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या कडेला इतर भाजी विक्रेत्यांसोबत बसून चक्क भाजी विकताना दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून अनेकांना विमल आर्थिक अडचणीत असल्याचं वाटलं. मात्र, त्यामागचं खरं कारण समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विकली भाजी

विमल एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनाप्पराईजवळील आपल्या मूळ गावी गेला होता. यावेळी स्थानिक बाजारातून जात असताना त्याने अचानक आपली गाडी थांबवली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांमध्ये तोही जाऊन बसला आणि स्वतः भाजी विकण्यास सुरुवात केली.

Tamil actor Vimal spotted selling vegetables
Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

व्हायरल व्हिडिओमध्ये विमल भाजीचं वजन करताना आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहे. त्याचा साधेपणा पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे, विमलने काही भाजी विक्रेत्यांना काही रुपये देऊन त्यांना मदतही केली. ‘रूटकास्ट’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. विमलने गरजेपोटी भाजी विकली नसून, स्थानिक शेतकरी आणि विक्रेत्यांना मदत करण्यासाठी त्याने स्वेच्छेने हा उपक्रम केल्याचं सांगण्यात आलं आहे.

Tamil actor Vimal spotted selling vegetables
Govinda: 'तू तिला माझी जागा देणार...'; गोविंदा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ? राखी सावंतसमोर सुनीताने केला मोठा खुलासा

चेक बाऊन्स प्रकरणामुळेही चर्चेत

दरम्यान, विमल सध्या एका चेक बाऊन्स प्रकरणामुळेही चर्चेत आहे. वृत्तानुसार, चेन्नईतील न्यायालयाने ४.५ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण त्याच्या ‘मन्नार वगैयरा’ चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. चित्रपटाच्या निर्मितीसाठी विमलने गोपी नावाच्या फायनान्सरकडून पैसे घेतले होते. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती देत अपील करण्यासाठी वेळ दिला आहे.

कोण आहे अभिनेता विमल?

विमल हा तमिळ अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने २००१ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पसांगा’ चित्रपटातून त्याला मुख्य भूमिका मिळाली. ‘केडी बिल्ला किल्लाडी रंगा’ हा त्याच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com