Predictions in Vishnu Purana SAAM TV
लाईफस्टाईल

Vishnu Purana: कलियुगासंदर्भातील ४ भाकितं संपूर्ण जगभरात ठरतायत खरी, पाहा विष्णू पुराणात काय नमूद केलंय?

Predictions in Vishnu Purana: विष्णू पुराण हा एक प्राचीन पौराणिक ग्रंथ मानला जातो. या पुराणातून मनुष्याच्या नैतिक कर्तव्यांबद्दलही माहिती मिळू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

विष्णू पुराण हा एक प्राचीन पौराणिक ग्रंथ मानला जातो. हिंदू धर्मामध्ये या ग्रंथांला फार महत्त्व देण्यात आलंय. या पुराणामध्ये भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांबद्दल माहिती देण्यातील आली आहे. सुख-समृद्धी आणि पवित्रता कायम ठेवण्याबाबत या पुराणात माहिती देण्यात आलीये. या पुराणातून मनुष्याच्या नैतिक कर्तव्यांबद्दलही माहिती मिळू शकते.

या पौराणिक ग्रंथामध्ये भगवान विष्णू यांनी हे जग कसे बदलणार? या जगात माणुसकी कशी संपुष्टात येईल आणि कोणत्या गोष्टींशी आसक्ती वाढू लागणार आहे याबाबत भविष्यवाणी केली आहे. कलियुगाबाबत विष्णु पुराणात अनेक गोष्टींची माहिती देण्यात आलीये. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

पैसे पाहून नाती जोडली जातील

कलियुगासंदर्भात विष्णू पुराणामध्ये अनेक भविष्यवाणी करण्यात आली आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, कलियुगात नाती ही पैसे किंवा संपत्ती पाहून बनवली जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, कलियुगामध्ये मैत्री ही वागणूक किंवा चारित्र्यापेक्षा पैसा पाहून जास्त असणार आहे.

घर बनवण्यासाठी अधिक खर्च होणार

विष्णु पुराणातील भविष्यवाणीत सांगण्यात आलं आहे की, कलियुगात मनुष्य पैसा जमा करण्यात व्यस्त असणार आहे, आणि त्यासाठी काहीही करण्यास तो मागे हटणार नाही. तो जे काही करतो ते पैशाशी संबंधित असणार आहे. या युगात घर बांधणाऱ्या लोकांकडे स्वतःचे घर नसून जे कमी काम करतात ते बंगल्यांमध्ये राहणार आहेत.

कलियुगात गुन्ह्यांची संख्या वाढणार

विष्णु पुराणात असं सांगण्यात आलं आहे की, ज्यावेळी कलियुग येईल तेव्हा गुन्ह्यांची संख्या सतत वाढत जाईल. या काळात चोरी, दरोडे, खून, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने समाजामध्ये अशांततेचं वातावरण राहणार आहे.

अकाली मृत्यूंची संख्या वाढणार

विष्णू पुराणामध्ये केलेल्या भविष्यवाणीनुसार, कलियुगात हवामान झपाट्याने बदलणार आहे. अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असून यावेळी दुष्काळही पडणार आहे. या काळात रोगांचा प्रादुर्भाव आणि अपघातही झपाट्याने वाढू शकतात. अशा परिस्थितीत, कलियुगात मनुष्य नैसर्गिकरित्या कमी आणि अकाली मृत्यूंची संख्या वाढणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT