Poppy Seeds Benefits
Poppy Seeds Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Poppy Seeds Benefits : वयोमानानुसार हाडांचे आरोग्य सुधारायचे आहे ? मसाल्यातील 'हा' पदार्थ ठरेल बहुगुणी !

कोमल दामुद्रे

Poppy Seeds Benefits : आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहे जे आपल्या आहारासाठी अतिशय उपयुक्त आहेत. ज्याचे सेवन केल्याने आपले आरोग्य सुधारते.

खसखस हे आपल्या स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाते. लहान बिया असलेले हे खसखस ​​आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खसखस खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात खसखस ​​सरबतासाठी वापरतात. कारण खसखसची चव थंड असते. याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो.

खसखस ही अफूच्या बोंडामध्ये मिळते. महाराष्ट्रात याचा वापर दिवाळीच्या (Diwali) फराळातील अनारसेसाठी होतो. तसेच, मकर संक्रातीचा हलवा व काही विशिष्ट पाककृतीमध्ये याचा वापर होतो. बाळांतिच्या पौष्टिक आहारात या खसखशीचा प्रमुख्याने वापर केला जातो.

खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, कॅलरीज, फॅट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, ओमेगा-६ फॅटी अॅसिड आणि फॉस्फरस यांसारखे पोषक तत्व आढळतात, जे शरीराला अनेक आरोग्य (Health) समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. खसखसचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. चला तर मग जाणून घेऊया खसखस ​​खाण्याचे आरोग्य फायदे.

१. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी

Constipation Problem

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी खसखसचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. खसखसमध्ये फायबर भरपूर असते, जे बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

२. हाडे मजबूत करण्यासाठी

strong Bones

खसखसचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. खसखसमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच, खसखसमध्ये मँगनीज आणि प्रथिने असतात जे कोलेजन तयार करण्यास मदत करतात. ज्यामुळे हाडांचे गंभीर नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

३. तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी

Mouth Ulcer

तोंडाचे व्रण दूर करण्यासाठी खसखसचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. खसखस बियांचा थंड प्रभाव असतो, त्यामुळे ते पोटातील उष्णता शांत करून तोंडाचे व्रण बरे करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, तब्बल १५ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांचं पालटणार नशीब, आर्थिक स्थिती होणार मजबूत, तुमची रास?

Horoscope 18 May : मेष ते मीन राशीसाठी शनिवार काय घेऊन आलाय?

TVS Apache चा नवीन Black Dark Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bachchu Kadu: निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये: बच्चू कडू

SCROLL FOR NEXT