Pomegranate Benefits SAAM TV
लाईफस्टाईल

Pomegranate Benefits: डाळिंबाची साल फेकून देताय? थांबा! पिंपल्सही होतील दूर अन् चेहरा दिसेल तरुण

Skin Care Tips: पावसाळ्यात चेहऱ्याची विशेष काळजी घ्या. त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक लावा. साधी रेसिपी जाणून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स, काळे डाग निघून जातील.

Shreya Maskar

पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. अशावेळी त्वचेचे पीएच संतुलित ठेवण्याचे काम डाळिंब करते. यामुळे त्वचा मुलायम राहते. डाळिंब हे एक स्वादिष्ट आणि पोषक तत्वांनी समृद्ध फळ आहे. पावसाळ्यात हे मोठ्या प्रमाणात मिळते. डाळिंबामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.

चेहऱ्याचे आरोग्य

डाळिंब आपल्या त्वचेचे तारुण्य जपते. त्वचेतील मृत पेशी कमी करण्यास मदत होते. तसेच पेशींना पोषणही मिळते. कारण डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला हिमोग्लोबिन मिळते. त्वचेच्या पेशींमध्ये रक्त प्रवाह वाढून त्वचा हायड्रेट राहते. डाळिंबमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचेला तरुण बनवते. डाळिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते. यामुळे मुरूम, पिंपल्स, चेहऱ्यावर काळे डाग येत नाहीत.

ओठांची त्वचा

डाळिंब मधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म ओठांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. ओठ कोरडे झाले असल्यास किंवा फाटले असल्यास नियमित डाळिंबाचा रस प्यावा. यामुळे ओठांची त्वचा मुलायम होते आणि तुमच्या ओठांना रंगही छान येतो.

डाळिंबाचे हे दोन फेस पॅक चेहऱ्याची चमक ठेवण्यास मदत करतील.

डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक

डाळिंबाची साल सुकवून मिक्सरला लावून त्याची पावडर बनवून घ्या. आता एका भांड्यामध्ये डाळिंबाची पावडर आणि दही मिक्स करून एकत्र पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी. पेस्ट सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून किमान एक वेळा तरी हा फेस पॅक लावल्यास तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.

डाळिंबाचा फेस पॅक

पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे खराब झालेली त्वचा तुम्ही डाळिंबाच्या फेस पॅकने मुलायम आणि तजेलदार करू शकतात. डाळिंबाच्या बियांची पेस्ट बनवून त्यामध्ये दूध आणि मध मिसळा आणि सर्व छान एकत्र करून घ्या. ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ करा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

SCROLL FOR NEXT