Poco Smartphone Google
लाईफस्टाईल

Poco Smartphone Launch : एम 7 प्रो 5 जीसोबत, POCO चे एकाचवेळी दोन स्मार्टफोन लॉन्च !

Poco Smartphone : स्मार्टफोनमध्ये पोको कंपनीचे नाव अग्रेसर आहे. पोको कंपनी नेहमीच युजर्ससाठी नवीन फोन बाजारात लॉंच करत असते. अशातच पोकोचा नवीन फोन बाजारात लवकर लॉंच होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्मार्टफोनमध्ये पोको कंपनीचे नाव अग्रेसर आहे. पोको कंपनी नेहमीच युजर्ससाठी नवीन फोन बाजारात लॉंच करत असते. अशातच पोकोचा नवीन फोन बाजारात लवकर लॉंच होणार आहे. त्यातच उत्‍साहपूर्ण वर्षाची धमाक्‍यात सांगता करत पोको या भारतातील सर्वात डायनॅमिक ग्राहक टेक ब्रँडने पोको एम७ प्रो ५जी आणि पोको सी७५ ५जी या दोन उल्‍लेखनीय स्‍मार्टफोन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या फोनचा डिवाईसेस डिस्प्ले , कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा कसा असेल हे आपण जाणून घेऊया.

पोको इंडियाचे कंट्री हेड यांचे म्हणणे आहे की, "पोकोमध्ये आमच्या सर्वांना सक्षम करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर नेहमी विश्वास आहे. एम ७ प्रो ५जी पॉवरहाऊस आहे, जो विभागातील सर्वात तेजस्वी एएमओएलईडी डिस्पे, उत्तम ऑडिओ आणि फ्लॅगशिप-ग्रेड कॅमेरांसह मिड-रेंज श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जातो. तसेच, सी ७५ ५जी ओन्ली सोनी सेन्सरसह सर्वात किफायतशीर ५जी स्मार्टफोन आहे. या लॉंचसह पोको चाहत्यांना अधिक नाविन्यता आणि अधिक मुल्य देण्याच्या मिशनप्रती बांधील आहे."

पोको ऑलिव्‍ह ट्विलाइटमध्‍ये उपलब्‍ध असलेला एम७ प्रो ५जी १,००० रुपयांची बॅंक सूट देणार आहे. सोबत ३ महिने नो-कॉस्ट ईएमआयसह १३,९९९ रुपयांच्या स्पेशल किमतीत उपलब्ध होणार आहे. ग्रीन,ब्लू आणि सिल्व्हर रंगांमध्ये हा पोको ६ उपलब्ध होणार आहे. हा फोन फक्त ७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. १९ डिसेंबरपासून सुरूवात होईल आणि एम ७ प्रो ची विक्री सुरू होणार आहे. पोको एम७ प्रोज ५जी मध्ये ६.६७ इंच जीओएलईडी एफएचडी+ स्क्रिनवर आकर्षक २१०० नीट्स पीक ब्राइटनेस मिळतो.

नयनरम्य लॅंडस्केपपासून रात्रीच्या वेळी आकर्षक फोटोंपर्यंत ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी ६०० कॅमरासह ओआयएस आणि विभागातील सर्वात मोठे एफ /१.५ अर्पेचर प्रत्येक फोटो आकर्षक व अपवादात्मक असण्याची खात्री देते. एआय नाइट मोड आणि एआय झूम सारख्या एआय-पॉवर वैशिष्ट्यांसह फोटो अधिक आकर्षकपणे कॅप्चर करता येतात. स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ प्रोसेसरची शक्ती, विभागातील एकमेव ४ एनएम चिप असलेला सी ७५ जी गेमिंग, मल्टीटास्किंग अशा बाबींसाठी विनासायास कार्यक्षमता देतो.

६.८८ इंच एचडी, स्क्रिनसह ६०० नीट्स ब्राइटनेस आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेट आकर्षक व्हिज्युअल्सची खात्री देतात. टीयूव्ही-प्रमाणित आय केअरसह दीर्घकाळापर्यंत आरामात मनोरंजनाचा आनंद घ्या. ५१६० एमएएच बॅटरीसह १८ वॅट फास्ट चार्जिंग, आयपी ५२ स्प्लॅश रेसिस्टण्स आणि एर्गोनॉमिक डिजाईन सी ७५ ५जी आव्हानात्मक काळात टिकून राहण्याची खात्री देतात. विशाल ५११० एमएएच बॅटरीसह ४५ वॅट फास्‍ट चार्जिंग डिवाईस प्रत्‍येकवेळी कार्यरत असण्‍याची खात्री देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT