PM Kisan Update
PM Kisan Update Saam Tv
लाईफस्टाईल

PM Kisan Update : पती-पत्नी दोघांनाही सरकारकडून मिळतील 6000 रुपये, जाणून घ्या कोणाला मिळेल लाभ

कोमल दामुद्रे

PM Kisan Update : तुम्ही PM किसान (PM KISAN) योजनेचे लाभार्थी असाल तर या बातमीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरकर शेतकऱ्यांना एका वर्षात ६००० रुपयांची तीन हप्त्यांमध्ये मदत करणार आहे. म्हणजेच वार्षिकतेनुसार २००० रुपये असतील.

आतापर्यंत या योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. कधी अर्जाबाबत, कधी पात्रतेबाबत, नियोजनापासून आतापर्यंत अधिक नवे नियम बनवले गेले आहेत. आता या योजनेत पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याबाबत बोलले जात आहे. त्याचे नियम जाणून घेऊया.

पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांत बदल

  • मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

  • ही योजना सुरु झाल्यापासून अनेक बोगस शेतकरी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता.

  • हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल केले आहेत.

  • नव्या नियमांनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे.

  • त्यानुसार लाभार्थी कुटुंबांना आपल्या रेशनकार्डसह आधार कार्ड, बँक पासबूक आणि PM-KISAN संकेतस्थळावरील घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील.

कोणाला होईल याचा फायदा ?

पीएम किसान (Farmer) योजनेच्या नियमांनुसार, पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर कोणी असे केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्याच्याकडून वसुली करेल. याशिवाय शेतकरी अपात्र ठरणाऱ्या अशा अनेक तरतुदी आहेत.

अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा (Scheme) लाभ घेतल्यास त्यांना सर्व हप्ते सरकारला परत करावे लागतील. या योजनेच्या नियमानुसार शेतकरी कुटुंबातील कोणी कर भरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ही व्यक्ती नसेल पात्र

नियमानुसार, जर एखादा शेतकरी आपली शेतजमीन शेतीच्या कामासाठी वापरत नसेल, किंवा दुसऱ्याच्या शेतात शेतीची कामे करत असेल आणि ती शेतं त्याची नसेल. अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर एखादा शेतकरी शेती करत असेल, पण शेती त्याच्या नावावर नसून त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल, तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या व्यक्तींनाही मिळणार नाही लाभ

जर कोणी शेतजमिनीचा मालक असेल, पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त झाला असेल, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल, तर असे लोकही शेतकरी योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्रांच्या यादीत येतात. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT