PM Kisan Scheme Saam tv
लाईफस्टाईल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या नव्या फीचरमुळे KYC करणे झाले सोपे, कसे कराल? जाणून घ्या

PM Kisan KYC Process : वृध्द शेतकरी व ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही त्या शेतकऱ्यांसाठी हे अॅप खूप फायदेशीर आहे.

कोमल दामुद्रे

PM Kisan KYC : शेतकऱ्यांसाठी सरकराने पहिल्यांदाच केंद्रीय कल्याण योजनेअंर्तगत PM-Kisan अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन फीचर आणले आहे. या नवीन फीचरमुळे शेतकऱ्यांना योग्य ती सुविधा सहज मिळू शकते.

नुकतेच कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी PM-Kisan चे अॅप लॉन्च केले आहे, ज्यामध्ये कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, कृषी सचिव मनोज आहुजा आदी राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे अॅप सगळ्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर (Benefits) ठरेल असे त्यांचे मत आहे.

या नवीन फीचरमुळे शेतकऱ्यांना वन-टाइम पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटऐवजी मोबाईल फोनवर त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच पीएम-किसान योजनेतील नवीन फीचर फेस ऑथेंटिकेशन ही मोबाईल (Mobile) अॅपद्वारे ई-केवायसी करणारी सरकारची पहिली योजना ठरली आहे. जे शेतकरी वृद्ध आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही त्यांच्यासाठी हे अॅप खूप फायदेशीर आहे.

1. पीएम-किसान अॅपचे वैशिष्ट्ये

अहवालानुसार, मंत्रालयाने यावर्षी 21 मे रोजी पीएम-किसान मोबाईल अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्याची चाचणी सुरू केली आणि तेव्हापासून 3 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी केले गेले. आत्तापर्यंत, पीएम-किसान लाभार्थ्यांची ई-केवायसी बायोमेट्रिक्सद्वारे किंवा आधारशी लिंक केलेल्या मोबाइल फोन नंबरवर पाठवलेल्या वन-टाइम पासवर्डद्वारे केली जात होती.

2. कसे कराल फेस ऑथेंटिकेशनसह KYC प्रक्रिया ?

  • यासाठी सर्वप्रथम Google Play Store वरून अॅप डाउनलोड करा.

  • तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दुसरे अॅप FACE RD APP डाउनलोड करावे लागेल.

  • त्यानंतर किसान योजना अॅपवर लॉगिन करा, त्यात लाभार्थीचे नाव टाइप करा आणि आधार क्रमांक लिहा.

  • आता तुमच्या आधार लिंक केलेल्या नंबरवर एक OTP येईल तो येथे भरायचा आहे.

  • आता MPIN सेट करा आणि सबमिट करा.

  • यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड आणि लॉगआउट असे दोन पर्याय असतील

  • डॅशबोर्डवर क्लिक करा, आता तुमची सर्व माहीती येथे दाखवली जाईल.

  • त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन फीचर ओपन होईल, तुम्ही ई-केवायसीचा पर्याय निवडून फेस ऑथेंटिकेशन करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील तलावात १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

Coolie Advance Booking Collection: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; पहिल्या दिवशी करणार इतक्या कोटींच कलेक्शन

SCROLL FOR NEXT