PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसानचा 14 हफ्ता कधी मिळणार ? हे काम केल्यावरच खात्यात जमा होणार पैसे

PM Kissan E-Kyc : सरकारकडून शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत ई-केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi YojanaSaam TV
Published On

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सरकारतर्फे दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर ४ महिन्यांत ३ आठवड्यांच्या कालावधीत २ हजार रुपये हफ्ता पाठवला जातो.

आतापर्यंत शेतकऱ्यांना (Farmer) एकूण १३ हफ्ते पाठवण्यात आले असून, शेतकरी १४ व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच सरकारकडून शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत ई-केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारणामुळे १४ वा हफ्ता पाठवण्यात आलेला नाही. ई-केवायसी झाल्यानंतर पैसे पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
Amazon Prime Lite : जियो सिनेमाला टक्कर देण्यासाठी अ‍ॅमेझॉन सज्ज; नव्या ऑफरमुळे यूजर्सचं स्वस्तात फुल्ल एन्टरटेंमेंट

1. १४ व्या हफ्त्या दरम्यान लाभार्थ्यांच्या संख्येत होऊ शकते घट

मागील काही आठवड्यांपासून लाभार्थ्यांच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे. यामागे जमिनीच्या नोदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. १४व्या हफ्त्यादरम्यान देखील अनेक अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक अपात्र शेतकऱ्यांना यापूर्वीच पैसे (Money) परत करण्याची सूचना देण्यात आली असून, असे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही ते शेतकरी या वेवसाईटवर जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

PM Kisan Samman Nidhi Yojana
Indian Railway Rule : रेल्वेचा नवा नियम ! ट्रेन चुकली तरी प्रवास होणार अधिक सुखकर, कसा ते जाणून घ्या सविस्तर
  • याकरीता तुम्हाला सर्वात आधी www.pmkisa.gov.in वर लॉग इन वर क्लिक करायचे आहे.

  • यावर क्लिक केल्यावर त्या वेबसाईटचे होम पेज उघडेल.

  • त्यानंतर E-KYC या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

  • त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा नोंद करायचा आहे.

  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर (Mobile) एक ओटीपी पाठवण्यात येईल.

  • ओटीपीची नोंद केल्यानंतर तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Kisan Samman Nidhi Yojana
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

2. शेतकरी येथे करू शकतात चौकशी.

पंतप्रधान किसान सन्माम निधी संबंधीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. त्याचबरोबर पंतप्रधान किसान योजनेच्या १५५६१ / १८००११५५२६ (Troll Free) किंवा ०११-२३३८१०९२ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com