Christmas Plum Cake ai
लाईफस्टाईल

Christmas Plum Cake : ख्रिसमस स्पेशल बनवायचाय? तर ही प्लम केकची चवदार रेसिपी करून पाहाच!

Christmas Treats: जगभरात ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला सगळे एकमेकांना भेटवस्तू देऊन दिवस आनंदात साजरा करतात.

Saam Tv

जगभरात ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला सगळे एकमेकांना भेटवस्तू देऊन दिवस आनंदात साजरा करतात. या दिवशी सुकामेवा आणि प्लम केक सुद्धा मोठ्या संख्येने खाण्याची पद्धत आहे. हा केक मुळात युरोपातला पदार्थ आहे. भारतात पहिल्यांदा १८८३ मध्ये केरळमध्ये तयार करण्यात आला होता. जगात एकूण १७ प्रकारचे प्लम केक तयार केले जातात. १८८३ पासून ममबल्ली कुटुंबच केरळमधील सर्वात मोठी बेकरी सांभाळते. चला तर जाणून घेऊया या स्पेशल प्लम केकची रेसिपी.

प्लम केक बनवण्याचे साहित्य

२ वाटी मैदा

१ चमचा बेकिंग पावडर

१ चमचा सोडा

१ वाटी बदाम, काजू पिस्ता काप करून,मनुका,

१/४ वाटी अपल तुकडे करून

१ वाटी साखर

१/४ वाटी आरेंज ज्यूस

३ व्हॅनीला इसेन्स

१ पेला दूध

१ चमचा सुंठ पावडर व जायफळ पूड अ‍ॅड

थोडी चेरी तुकडे करून,टुटीफ्रुटी

१/४ कप कोको पावडर

5 चमचे साखर

प्लम केक बनवण्याची कृती

प्रथम सर्व सुकामेवा व टुटीफ्रुटी,चेरी ऑरेंज ज्यूस मध्ये अर्धा तास भिजवून ठेवा . आता अ‍ॅपलचे बारिक तुकडे करून घ्या. पुढे पाच चमचे साखर पॅनमध्ये अ‍ॅड करून विरघळून घ्यावी. मग एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा अ‍ॅड करून त्यात सुंठ पावडर व जायफळ पावडर मिक्स करा.आता कोको पावडर त्यात अ‍ॅड करा. मग साखर टाकून मिक्स करा आणि दुध अ‍ॅड करून घ्या.

मग त्यात दूध अ‍ॅड करा. आता उरलेले जिन्नस त्यात एकत्र करा. तुमचे मिश्रण तयार आहे. आता तुम्ही हवा त्या आकाराचा डबा घ्या. त्याला बटर किंवा तेल लावून घ्या. मग त्यात तयार बॅटर अ‍ॅड करा. हे तुम्ही गॅस, ओवन आणि कुकरमध्ये कशातही करू शकता. आता तो डबा झाकण लावून ४० मिनिटे मंद आचेवर ठेवू शकता. चला तुमचा प्लम केक तयार आहे. हा तुम्ही थंड झाल्यावर कापू शकता त्यावर तुम्ही हवी तशी डिजाईन सुद्धा तयार करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT