Nashik Fraud Case
Nashik Fraud CaseSaam tv

Nashik Fraud Case : साखर निर्यातदार महिलेला तब्बल अडीच कोटी रुपयाचा गंडा; संशयीताला पोलिसांनी केली अटक

Nashik News : साखर निर्यात करण्यासाठी साखर निर्यातदार महिला व्यावसायिकाकडून २० कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी दोन कोटी ५३ लाख ३६ हजारांची रक्कम घेण्यात आली होती
Published on

तबरेज शेख 
नाशिक
: प्रदेशात साधारण २० टन साखर निर्यात करावयाची होती. हि साखर निर्यात करण्यासाठी शिपिंग व्यावसायिकाने सुमारे २ कोटी ५३ लाख ३६ हजाराची रक्कम घेतली. मात्र त्याने साखर खरेदी न करता सर्व रक्कम घेत महिलेची फसवणूक केली. याबाबत महिलेला माहिती झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.   

नाशिकच्या शिपिंग कंपनीद्वारे श्रीलंकेत १२ हजार मेट्रिक टन साखर निर्यात करावयाची होती. साखर निर्यात करण्यासाठी साखर निर्यातदार महिला व्यावसायिकाकडून २० कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी दोन कोटी ५३ लाख ३६ हजारांची रक्कम घेण्यात आली होती. मात्र साखर खरेदी न करता फसवणूक करणाऱ्या शिपिंग व्यावसायिकाला अटक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या संशयित विरोधी पथकाने मीरा- भाईंदर येथे ही कारवाई केली. 

Nashik Fraud Case
Jalna Farmer News : नुकसानग्रस्त तीन लाख शेतकरी मदतीपासून वंचित; जालना जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान

अमित अनंत महाडिक असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तक्रारदार महिला दाणी यांनी साखर निर्यातीचा व्यवसाय सुरू केला आहे. मुलुंड येथील स्टर्लिंग पॉवर जेनेसीस कंपनीने दाणी यांना श्रीलंकेत १२ हजार मेट्रिक टन साखर पाठविण्याची ऑर्डर दिली होती. दाणी यांनी शिपिंग कंपनीशी संबंधित संशयित अमित महाडिक (रा. विरार) यास साखर खरेदी करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून रक्कम देखील दिली.

Nashik Fraud Case
Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे आता दोन तासात घेता येणार दर्शन; बालाजी, वैष्णो देवीच्या धर्तीवर टोकण दर्शन व्यवस्था

संशयित अमित महाडिक याने कोल्हापूर येथून २० कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी वेळोवेळी वरील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केली. संशयिताने सुप्रीम कंटनेर कंपनीमार्फत श्रीलंका येथे पाठवण्याकरिता साखर दिली असल्याचे सांगितले. मात्र दाणी यांनी संबंधित शिपिंग कंपनीतून माहिती घेतल्या नंतर संशयित महाडिक आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी साखर खरेदीच केली नसल्याची माहिती समोर आली.  

यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दाणी यांच्या लक्षात आल्यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात २९ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांकडून तपास सुरु असताना नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अमित महाडिक याला मीरा- भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com