Shanivar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Saturday Upay: शनिवारच्या दिवशी या उपायांनी करा शनिदेवाला प्रसन्न; गरीब व्यक्तीही होईल गडगंज श्रीमंत

Shanivar che Upay: शनिदेव हे न्यायदेवता म्हणून ओळखले जातात आणि ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. ज्यांच्यावर शनीची साडेसाती, ढैय्या किंवा महादशा सुरू असते, त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो. त्यानुसार शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करून काही उपाय करणं फायद्याचं मानलं जातं. भक्तीने दान करणं खूप शुभ मानलं जातं. या गोष्टी केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि शनिदेव आपल्या भक्तावर खूप प्रसन्न होतात.

जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही शनिदेवाची पूजा करावी, यामुळे शनिदेव प्रसन्न होऊ शकतात आणि तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सोडवू शकता.

तेलामध्ये तुमचा चेहरा पाहा

शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जा आणि एका भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. नंतर तो भांडा शनिदेवाच्या चरणी ठेवा. असं केल्याने शनीची वाईट नजर दूर होण्यास मदत होते. शनिदेवाला मोहरीचं तेल खूप आवडतं अशी पौराणिक मान्यता आहे.

तूपाचा दिवा

शनिवारी संध्याकाळी घराच्या मंदिरात किंवा घराच्या प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि लोकांच्या आर्थिक समस्या दूर होतात. यावेळी भगवान शनिदेव देखील यावर खूप प्रसन्न होतात.

काय दान करावं?

शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ, उडीद डाळ, चामड्याचे बूट आणि चप्पल, छत्री आणि टोपी यासारख्या वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान केल्या पाहिजे. ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. परिणामी या व्यक्तीला चांगल्या कर्मांचं फळ मिळतं.

पिंपळाच्या झाडाला आग लावा

शनिवारी शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केलं पाहिजे. तसंच पिंपळाच्या झाडाच्या तीन फेऱ्या आणि मारल्या पाहिजेत. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी हा उपाय खूप महत्वाचा मानला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT