Meen Rashi 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Meen Rashi 2024 : नव्या वर्षात मीन राशीवर येणार मोठं संकट! करिअरमध्ये करावा लागणार अडचणीचा सामना, प्रवास करणे टाळा

Meen Rashi Yearly Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रातनुसार जन्मकुंडलीतील बारावी रास मीन. मीन राशीवर गुरु ग्रहाचे वर्चस्व असते. हा ग्रह ज्ञान, अध्यात्म, वृद्धि आणि समृद्धीचा कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडली गुरु ग्रह शुभ स्थितीत विराजमान असेल तर शुभ फले मिळतील.

कोमल दामुद्रे

Pisces Rashibhavishya In Marathi 2024 :

ज्योतिषशास्त्रातनुसार जन्मकुंडलीतील बारावी रास मीन. मीन राशीवर गुरु ग्रहाचे वर्चस्व असते. हा ग्रह ज्ञान, अध्यात्म, वृद्धि आणि समृद्धीचा कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडली गुरु ग्रह शुभ स्थितीत विराजमान असेल तर शुभ फले मिळतील.

समाजात मान सन्मान मिळेल. प्रतिष्ठा प्राप्त होईल. नवीन वर्षात कुंडलीनुसार लग्न स्थानात राहू ग्रह स्थित असल्यामुळे तर दुसऱ्या भावात गुरु असल्यामुळे शुभ-अशुभ फले प्राप्त होतील. कसे असेल मीन राशींसाठी नवीन वर्ष जाणून घेऊया.

मीन राशीसाठी नवीन वर्ष कामाच्या बाबतीत चढ उताराचे असणार आहे. व्यवसायात (Business) काही प्रमाणात चांगला नफा मिळू शकतो. नोकरदारांसाठी हे वर्ष काही प्रमाणात चांगले असेल. राहूमुळे तुमच्या कामात आणि व्यवसायात नव्या संधी मिळतील.

आर्थिक स्थितीच्या बाबतीत यंदाचे वर्ष मागील वर्षाच्या तुलनेत चांगले असेल. गुरु धनस्थानी असल्यामुळे पैसा (Money) मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. घर किंवा वाहन खरेदी करु शकता. अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्याल. दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकते.

विद्यार्थ्यांसाठी येणारे नवीन वर्ष हे आव्हानात्मक असणार आहे. मेहनतीचे फळ हे उशिरा मिळेल. परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. अभ्यासात निष्काळजीपणा करु नका.

प्रेमसंबंधात यंदाचे येणारे वर्ष संमिश्र असणार आहे. प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. नात्यात गैरसमज निर्माण होतील. वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होईल. नातेसंबंधाची काळजी घ्याल.

मीन राशीसाठी यंदाचे वर्ष आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. कामाच तणाव जाणवू शकतो. तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मोठी समस्या उद्भवू शकते. रक्ताची कमतरता असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मायग्रेनचा त्रास उद्भवू शकतो. डोकेदुखीमुळे त्रास होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT