Pimple Home Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Pimple Home Remedies: पिंपल्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावर सतत डाग दिसतात? या टीप्स फॉलो करा

Skin Care Tips : धूळ, प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. आपल्यापैकी अनेकांना ते फोडण्याची घाणेरडी सवय असते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग राहून त्वचेचे सौंदर्य कमी होत जाते.

कोमल दामुद्रे

Pigmentation On Skin :

धूळ, प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. आपल्यापैकी अनेकांना ते फोडण्याची घाणेरडी सवय असते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग राहून त्वचेचे सौंदर्य कमी होत जाते.

मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय (Home Remedies) करतात. परंतु, मुरुमे गेल्यानंतर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहातात. ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. हार्मोनल बदल, तेलकट त्वचा (Skin), केमिकल प्रोडक्टचा अतिवापर, शरीरातील विषारी पदार्थ, धूळ आणि प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. मुरुमांनंतर चेहऱ्यावर हायपरपिग्मेंटेशनची समस्या होते.

अनेक जण हायपरपिग्मेंटेशनच्या या समस्येवर उपचार करतात किंवा क्रिम्सचा वापर करतात. जर तुम्हालाही या डागांपासून सुटका हवी असेल तर हा घरगुती उपाय करुन पाहाच

लिंबू- मध फेसपॅक

लिंबू आणि मध पिंपल्सचे डाग दूर करण्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. लिंबूमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे डाग जाण्यास मदत होते. यामुळे मेलेनिनचे प्रमाण कमी करते. त्वचेला खोलवर स्वच्छ करते. यासोबत मधाचा देखील त्वचेसाठी चांगला फायदा (Benefits) होतो. याच्या वापरामुळे डाग दूर होण्यासोबतच त्वचेला मॉइश्चरायझेर करते. या फेस मास्कचा वापर केल्याने चेहरा स्वच्छ, सुंदर आणि मुलायम होतो. हा फेस पॅक कसा बनवायचा पाहूया.

एक चमचा लिंबाच्या रसात चमचाभर मध मिसळवा. दोन्ही चांगल्याप्रकारे मिक्स झाल्यानंतर हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT