Piles Treatment  Saam Tv
लाईफस्टाईल

Piles Treatment : मुळव्याधाच्या समस्येवर झेंडूची फुलं रामबाण, कसा कराल वापर? जाणून घ्या

Home Remedies : मूळव्याध होण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात.

Shraddha Thik

Piles Treatment At Home :

मूळव्याध होण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. त्याचा त्रास इतका असतो की लोकं रोज पेनकिलर घेतात. मुळव्याधांचा त्रास वाढल्याने ऑपरेशनची गरजही निर्माण होते. जीवनशैलीतील बदल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही मुळव्याधाची समस्या (Problems) उद्भवू शकते.

मुळव्याधामुळे वेदना (Pain) होतात आणि कधी कधी मल वाहताना रक्तस्त्राव होतो. यावर अनेक आयुर्वेदिक उपचार आहेत ज्याद्वारे मूळव्याधापासून आराम मिळू शकतो. तसेच झेंडूच्या फुलाने मूळव्याधाच्या त्रासावर रामबाण उपाय ठरेल. कसे ते जाणून घेऊया.

मूळव्याधाच्या उपचारात झेंडूचा वापर

मूळव्याध (Piles) असलेल्या लोकांच्या गुदद्वाराभोवती अनेक चामखीळ सारखी पुरळ निर्माण होते, ज्यामुळे खाज आणि वेदना होतात.

झेंडूची फुले 5-10 ग्रॅम तुपात तळून दिवसातून तीन वेळा सेवन करा. यामुळे रक्तस्त्राव किंवा रक्ताळलेल्या मूळव्याधांमध्ये आराम मिळतो.

रक्ताळलेल्या मूळव्याध असल्यास 5 ते 10 ग्रॅम झेंडूच्या फुलाचा रस दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन करा, असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.

झेंडूची पानेही औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी, सुमारे 10 ते 15 ग्रॅम झेंडूची पाने 2 ग्रॅम काळी मिरी सह बारीक करा. ही पेस्ट पाण्यासोबत प्या, खूप फायदे होतील.

मूळव्याध मध्ये रक्तस्त्राव थांबवण्यासाठी 250 ग्रॅम झेंडूची पाने आणि दोन किलो केळीची मुळी घेऊन दोन्ही रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याचा रस काढा. या रसाचे 15-20 मिली सेवन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाच्या शर्यतीतून 'हा' दावेदार बाहेर; बिग बॉसमध्ये शॉकिंग एलिमिनेशन, नाव वाचताच बसेल मोठा धक्का

Maharashtra weather update : थंडी ओसरली! राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT