Piles Control Tips : भर उन्हाळ्यात होतोय पाइल्सचा त्रास? 'हे' पदार्थ आहारातून करा बाहेर

Piles Control Home Remedies : उन्हाळ्यात शरिरात पाण्याच्या कमरतेमुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे काहीवेळेस मलप्रवाहात समस्या निर्माण होते त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होतो.
Piles Control Tips
Piles Control TipsSaam Tv
Published On

Piles Harmful Foods : उन्हाळ्यात शरिरात पाण्याच्या कमरतेमुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे काहीवेळेस मलप्रवाहात समस्या निर्माण होते त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होतो. पण या रोगाचा उल्लेख आल्यावर लोक सहसा संकोच करतात. आजकाल जगात अनेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

परंतु लाजेमुळे ही समस्या सांगण्यात संकोच करतात किंवा डॉक्टरांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत. हा आजार (Disease) अन्न आणि जीवनशैलीशी (Lifestyle) संबंधित आहे. या दोन्हीचे निराकरण केले तर ही समस्याही आपोआप संपते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Piles Control Tips
Piles Hemorrhoids Symptoms : गुद्दद्वारामध्ये गाठ व ब्लिडिंग होतेय ? असू शकते मुळव्याध्याचे लक्षण, जाणून घ्या

मुळव्याधामध्ये 'या' गोष्टी टाळा -

चहा-कॉफीचे सेवन कमी करा -

जेव्हा एखादी व्यक्ती चहा किंवा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करू लागते तेव्हा मूळव्याध नियंत्रण घरगुती उपायांची समस्या उद्भवते. खरंतर चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. याच्या अतिसेवनामुळे शरीरात पाण्याची (Water) कमतरता होते आणि मलप्रवाहात समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा.

बेकरी उत्पादने टाळा -

बेकरीमध्ये बनवलेले केक, पेस्ट्री, ब्रेड यांसारखे पदार्थ पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पोटातील पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊन शरीरातील चयापचय क्रिया प्रभावित होतात. या गोष्टी जर तुम्ही रोज खाल्लात तर मुळव्याध हा आजार होण्यास जास्त वेळ लागत नाही.

Piles Control Tips
Piles Home Treatment : 'या' चुकीच्या सवयींमुळेही होऊ शकतात हेमोरॉइड्स, वेळेत बरे होणे महत्वाचे

या भाज्या खाणे टाळा -

अशा अनेक भाज्या आहेत, ज्या खाल्ल्याने गॅस-अ‍ॅसिडिटी, अपचन आणि ढेकर येण्याची समस्या वाढते. यामध्ये सिमला मिरची, फ्लॉवर, बटाटा, कोबी या भाज्यांचा समावेश आहे. या भाज्या नियमितपणे खाल्ल्याने पचनसंस्था कमजोर होते, त्यामुळे मूळव्याधची समस्या होते.

तळलेले अन्न टाळणे -

खूप मसालेदार आणि तळलेले अन्न नेहमीच हानिकारक असते. त्यामुळे शरीरात चरबी वाढते, तसेच ते सहज पचत नाही. असे अन्न खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो, जो नंतर मूळव्याधाचे रूप घेतो. जर तुम्हाला हा आजार स्वतःपासून दूर ठेवायचा असेल तर तळलेले अन्न टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com