Pigeons Affect Lungs Health Saam Tv
लाईफस्टाईल

Pigeons Affect Lungs Health: तुमच्या घराच्या खिडकीत सतत कबुतर येतात? वेळीच सतर्क व्हा, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

Pigeons Affect On Human Health: कबूतर या पक्षाच्या संपर्कात आल्याने न्यूमोनिटीस हा गंभीर आजार होतो. न्यूमोनिटीस हा न्यमोनिया सारखा घातक आजार आहे. या आजारात माणसांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो.

Manasvi Choudhary

कबूतर हा पक्षी सहज कुठेही उडताना दिसतो. अनेकजण कबुतरांना धान्य खायला घालतात.घराच्या छतावर, खिडकीत, इमारतीच्या टेरेसवर कबूतर घरटे बांधतात आणि राहतात. मात्र आता कबुतरांचं आपल्या जवळ येणं थाबवलं पाहिजे. कारण कबुतरांमुळे माणसाच्या आरोग्याला (Health) धोका निर्माण होत असल्याचे9 समोर आलं आहे.

कबूतर या पक्षाच्या संपर्कात आल्याने न्यूमोनिटीस (Pneumonitis) हा गंभीर आजार होतो. न्यूमोनिटीस हा न्यमोनिया सारखा घातक आजार आहे. या आजारात माणसांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे त्याला न्युमोनिटीस सारखा गंभीर आजार होतो. त्यामुळे माणसांनी आरोग्याची वेळीच काळजी घ्यायला हवी. दरम्यान फुफ्फुसाच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

कसा होतो न्यूमोनिटीस?

न्यूमोनिटीस हा आजार कबुतरांची पंख आणि विष्ठा यामुळे होतो. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस नावाची बुरशी असते. जी मानवी आरोग्यासाठी घातक आहे. कबुतरांची बुरशी श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर हा संसर्ग होतो. न्यूमोनिटीस हा आजार झाल्याने शरीराच्या फुफ्फुसातील पेशींना सूज येते. यामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो.

काय काळजी घ्याल?

कबुतरांमुळे होणारा न्यूमोनिटीस हा आजार लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींना अधिक होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने या आजाराचा संसर्ग लवकर होतो. अशावेळी न्यूमोनिटीस हा आजार होऊ नये यासाठी आरोग्याची अशी योग्य काळजी घ्या.

१) घराच्या छतावर किंवा खिडकीत कबुतरांना अन्न खायला घालू नये. मोकळ्या मैदानात कबुतरांना अन्न खायला द्या.

२) घराच्या खिडकीत कबुतर येऊ नये. म्हणून व्हिनेगर पाणी शिंपडा. व्हिनेगरच्या वासाने कबुतर येणार नाहीत.

३) घरामध्ये खिडकीला बारीक जाळी लावा. यामुळे कबूतर येणार नाहीत.

४) कबुतरांना चिकट जागेत बसायला आवडत नाही. यामुळे तुम्ही कबूतर घराजवळ येऊ नये म्हणून मध आणि डिंकचा वापर करू शकता.

५)बाहेरून आल्यानंतर, जेवण्यापूर्वी हात - पाय स्वच्छ धुवा. पक्ष्यांना धान्य दिल्यानंतर हात- पाय स्वच्छ धुवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT