Physiotherapy Treatment List, Physical Therapy Exercise for Pain Relief, What Is Physiotherapy Treatment ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात अनेक वेदनांपासून दूर ठेवते फिजियोथेरपी

फिजियोथेरपी म्हणजे काय ?

कोमल दामुद्रे

मुंबई : बदलत्या हवामानामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. पावसाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे आपल्याला शरीराला चालना मिळत नाही. वातावरणातील गारव्यामुळे शरीरात आळस चढतो. (What Is Physiotherapy Treatment)

हे देखील पहा -

पावसाळा तसा खूप अल्हादायक असतो. पण काहींना मात्र हा खूप वेदनादायक ठरतो. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना हा खूप त्रासदायक ठरतो. अशा माणसांनी पावसाळ्यात फिजियोथेरपी केल्यास आराम मिळू शकतो. बदलत्या मोसमासोबत काही लोक विविध प्रकारे प्रतिक्रिया करतात. ज्याचे कारण हवेचा बदलता दाब, तापमान आणि आर्द्रता असते. हे सारे बदल व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात आणि रोगाची लक्षणे वाढवतात. यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो.

फिजियोथेरपी म्हणजे काय ?

फिजियोथेरपी कोणत्याही औषधाशिवाय रुग्णाला बरे करणारी विज्ञानाची शाखा आहे. याचे वैशिष्टय म्हणजे या प्रक्रियेत रुग्णावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. फिजियोथेरपीत व्यायाम आणि यांत्रिक उपचार विशेष रुपात रुग्णानुसार तयार केले जातात.

कोणत्या आजारावर फायदेशीर -

मानदुखी, खांदेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, स्नांयूच्या वेदना, टाचदुखी, स्ट्रोक, स्पोर्ट एन्ज्युरी, बेल्स पल्सी आणि पोस्ट फ्रॅक्चर यांसारख्या आजारांवर फिजियोथेरपीचा फायदा होतो. (Physical Therapy Exercise for Pain Relief)

उपचार

१. पूर्वीपासून गुडघ्यांचा त्रास असेल तर जिन्यांचा वापर कमी करावा. गुडघे वाकून बसू नये.

२. रात्री दही वा थंड (Cold) पदार्थ खाणे टाळावे.

३. वेदना जास्त त्रासदायक असतील तर जवळच्या फिजियोथेरपी सेंटरमध्ये संपर्क साधावा.

या गोष्टींची काळजी घ्या

१. जास्त थंड पाणी (water) पिऊ नये.

२. रात्री आईस्क्रिम, दहीभात, कोल्डड्रिंकचे सेवन करु नये.

३. योग्य पोश्चरकडे लक्ष द्यावे.

४. सकाळच्या कोवळ्या उन्हात जावे.

५. नियमित व्यायाम करावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT