मुंबई : आपल्या नेमका कोणता आजार झाला आहे हे लवकर कळत नाही. अनेकदा त्या आजाराचे उशिरा निदान झाल्यानंतर आपण त्यावर औषधोपचार करु लागतो.
हे देखील पहा -
अचानक घसा दुखणे, चावताना किंवा गिळताना त्रास होणे, बोलताना बदलेला आवाज, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे किंवा मासिक पाळीत होणारे बदल ही लक्षणे थायरॉइडची तर नाही ना ! आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. जगभरात (World) ६० टक्के पीडितांना आजार (Disease) कळतच नाही. काही लोक थायरॉइडला आपले वजन वेगाने वाढण्या-घटण्याशी जोडतात, काहींना धूसर दिसू लागते, एखादी गोष्ट आठवण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे असू शकतात. थॉयरॉइडचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.
१. हायपोथायरॉइडिज्मममुळे एंग्झायटी व डिप्रेशन वाढते. डिप्रेशन थायरॉइडचे पहिले लक्षण आहे. अशावेळी एंग्झायटीमुळे व्यक्तीचा मूड सतत बदलता राहू शकतो.
२. कित्येकदा थायरॉइडमुळे डोळ्यांजवळ आढळणाऱ्या टिशूत जादा तरल पदार्थ एकत्रित होतात. यामुळे डोळ्यांना नियंत्रित करणारे स्नायू मोठे होतात. व्यक्तीला धूसर वा डबल व्हिजनची समस्या होऊ शकते.
३. थायरॉइड योग्यप्रकारे काम करीत नसते तेव्हा तोंड वा मेंदू वा दोन्हींच्या स्थानांच्या स्वादग्रंथी प्रभावित होतात.
आपल्याला यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी आपल्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात. हा त्रास आनुवंशिक देखील असू शकतो किंवा, मधुमेह, आमवाताचा रुग्ण व साठी ओलांडल्यानंतरही होऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.