व्यायामाने घटवा मांड्यांचे वजन !

व्यायाम करुन मांड्यांचे वजन असे कमी करा.
thighs excercise, Weight loss tips
thighs excercise, Weight loss tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्या शरीरयष्टीनुसार आपले वजन वाढत असते. आपले वजन वाढले की, आपल्याला कपडे अधिक घट्ट होऊ लागतात.

हे देखील पहा-

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण व्यायामासोबत आहारात (Food) देखील बदल करत असतो. वाढलेल्या वजनामुळे आपण अधिक त्रस्त असतो. वजन वाढले की, त्याचा आपल्या शारीरिक व मानसिकतेवर परिणाम होऊ लागतो. तसेच आपल्याला आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.बहुतेक महिला या स्थूल मांड्यांमुळे त्रस्त असतात. चालताना मांड्यांची चरबी घासली जाणे, त्वचा सोलवटणे हे असे अनेक दिवस सतावत असते. मांड्यांचे वाढलेले वजन कमी करणे हा यावर एकमेव उपाय आहे. यासाठी आपण घरबसल्या पायांचे काही सोपे व्यायाम करून वाढलेल्या चरबीपासून सुटका मिळवू शकतो. असे रोज केल्याने आपल्याला फरकही जाणवेल.

१. एक छोटा भक्कम स्टूल घ्या. दोन्ही हात कंबरेवर ठेवा. प्रथम स्टूलवर उजवा पाय ठेवून वजन द्या. पुढील बाजूला वर उठा आणि सोबतच डावा पायही वर उचलत गुडघ्यात वाकवा. डावा पाय पुन्हा जमिनीवर आणा.

thighs excercise, Weight loss tips
३० ते ४० वयोगटातील पुरुषांचे डाएट कसे असायला हवे ?

२. सर्वप्रथम सरळ उभे राहा. आता उजवा पाय याच दिशेला दोन पावलांएवढ्या अंतरावर वाढवा. पायावर वजन देत थोडे वाका. असे केल्यामुळे उजवा गुडघा स्वतःच वाकेल आणि डाव्या पायावर ताण राहील. असे करताना दोन्ही हात पुढे ठेवा.

३.दोन्ही पाय जोडून सरळ उभे राहा. आता उजवा पाय दोन पावले मागे न्या आणि खाली इतके झुका की गुडघा जमिनीला हलकासा स्पर्श करील. झुकताना पुढील गुडघा वाकेल याकडे लक्ष द्या.

४. पाय खांद्यांना समांतर पसरून सरळ उभे राहा. दोन्ही पायांचे गुडघे वाकवत खुर्चीवर बसल्या अवस्थेत या. शरीराचा वरचा भाग पुढे झुकवा असे करताना हात पुढील बाजूला ठेवा. या स्थितीत पाच ते दहा सेकंद थांबा व पूर्वीच्या स्थितीत परत या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com