Petrol Diesel Prices On 8 September Saam TV
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price : आज 8 सप्टेंबर या ठिकाणी बदलल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, पाहा तुमच्या शहरातले दर...

Petrol Diesel Rate Today : देशभरात आज म्हणजेच शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Price :

देशभरात आज म्हणजेच शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईसह देशातील प्रमुख शहरे नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती काय ठरल्या आहेत ते जाणून घेऊया.

आज ब्रेंट क्रूड ऑइल (Oil) 0.40 टक्क्यांनी घसरल्यानंतर ते $89.56 वर आहे. तर WTI कच्च्या तेलाची किंमत 0.41 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि ती प्रति बॅरल $ 86.51 वर आहे.

चार महानगरांमध्ये किती दर आहेत?

  • नवी दिल्ली - पेट्रोल (Petrol) 96.72 रु., डिझेल 89.62 रु

  • मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

  • चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

तुमच्या शहराचे नवीन दर कसे तपासायचे -

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस पाठवावा लागेल. BPCL ग्राहक किंमत जाणून घेण्यासाठी 9223112222 वर <डीलर कोड> पाठवू शकतात. इंडियन ऑइलची ग्राहक किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> 9224992249 वर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहकांसाठी इंधन दर जाणून घेण्यासाठी, HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवा. यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत नवीनतम दराची माहिती मिळेल.

प्रत्येक शहरात वेगवेगळे दर का?
प्रत्येक शहरात (City) पेट्रोलचे दर वेगवेगळे असण्याचे कारण म्हणजे कर. त्याच वेळी, राज्य सरकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल करतात. त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगरपालिकांनाही प्रत्येक शहरानुसार कर आहे. हे शहरानुसार बदलतात, ज्यांना स्थानिक संस्था कर देखील म्हणतात. प्रत्येक महानगरपालिकेवर वेगवेगळे करही आकारले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi: कुंभ राशीचा शनिवार कसा जाणार? दुपारनंतर मिळणार मोठा लाभ; वाचा राशीभविष्य

देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी? कारण आलं समोर

रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Udid Dal Vada : उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT