Safety Tips at Petrol Pump Saam Tv
लाईफस्टाईल

Safety Tips at Petrol Pump : पेट्रोल पंपावर जाताय? या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...

Petrol Pump Rules : पेट्रोल पंपावर जाताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Pump Rules And Regulation :

आजकाल लोक वाहतुकीसाठी सर्वात जास्त खासगी वाहनांचा वापर करतात. खासगी वाहनांचा वापर म्हटल्यावर पेट्रोल डिझेलच्या लांबच लांब रांगा लागतात. जर तुम्ही कोणतेही वाहन वापरत असाल तर इंधनासाठी तुम्ही पेट्रोल पंपावर जाता. परंतु या पेट्रोल पंपावर जाताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

पेट्रोल पंपावर तुम्ही कधी गेला असाल तर तिथे नेहमी वॉर्निंग बोर्ड लावलेला असतो. या बोर्डवर लिहलेल्या सूचनांकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. वाहन चालवताना जसे नियमांचे पालन करायचे असते. तसेच काही नियमांचे पालन तुम्ही पेट्रोल पंपावर असताना करायचे असते.

पेट्रोल पंपावर ही काळजी घ्या

पेट्रोल पंपावर असताना नेहमी काही नियम पाळणे महत्त्वाचे असते. यात तुमच्या कार किंवा बाईकमध्ये तुम्ही पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी टाकण्यास सुरुवात केली असेल तर त्यादरम्यान तुमच्या कारचे इंजिन बंद ठेवा. इंजिन बंद न ठेवल्यास आग लागू शकते. यामुळे तुम्ही मोठा धोक टाळू शकता.

आग लागणारी कोणतीही वस्तू ठेवू नका

पेट्रोल पंपामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे तिथे आग लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पेट्रोल पंपाला आग लागण्यासाठी एक छोटी ठिणगी पुरेशी असते. त्यामुळे आग लागणारी कोणतीही वस्तू पेट्रोल पंपावर वापरु नका. यामध्ये माचिस, लाइटर या गोष्टी वापरणे टाळा.

पेट्रोल पंपावर मोबाईल बंद ठेवा

पेट्रोल पंपावरील सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे फोन वापरु नये. अनेक जण पेट्रोल पंपावर फोन वापरता. परंतु यामुळे खूप मोठा अनर्थ घडू शकतो. फोनचा ब्लास्ट होऊ शकतो किंवा आग लागू शकते. त्यामुळे पेट्रोल पंपावर फोन वापरणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT