Perfect Puri Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Perfect Puri Recipe : तेलात टाकताच पुरी टम्म फुगेल; फक्त पीठ मळताना 'या' चुका करू नका

Ruchika Jadhav

आज नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उद्या सर्वत्र दसरा दणक्यात साजरा होणार आहे. घराघरात खमंग भजी, श्रीखंड आणि पुरीचा बेत असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी सणानिमित्त अनेक व्यक्ती घरी हमखास श्रीखंड पुरीच बनवतात. पुरी बनवणे फार सोपं आहे. मात्र अनेक महिलांना परफेक्ट पुरी बनवताच येत नाही.

पुरी कितीही गोल बनवली तरी देखील तेलात टाकल्यावर ती फुलत नाही किंवा कडक होते. अशी तक्रार अनेक महिला करतात. त्यामुळे आज पुरीसाठी कणीक मळताना कोणती काळजी घेतली पाहिजे. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पुरीसाठी पीठ मळताना ही काळजी घ्या

पुरीसाठी पीठ मळताना सर्वात आधी एका मोठ्या वाटीत पीठ पाढून घ्या. काही महिला पिठामध्ये तेलाचं मोहन घालतात. मात्र गव्हाची पुरी बनवताना त्यात चुकूनही तेलाचे मोहन टाकू नका. कारण त्याने पुरी कडक होते.

पुरीसाठी कणीक मळताना त्यात थोडे थोडे पाणी मिक्स करा. पाण्याचा व्यवस्थित अंदाज घ्या. आपण चपातीसाठी ज्या पद्धतीने कणीक भिजवतो अगदी तशीच कणीक यासाठी मळू नका.

तपातीसाठी कणीक मऊ मळली जाते. तप पुरी बनवण्यासाठी कणीक मळताना थोडी घट्ट मळली जाते. त्यानंतर कणीक मळून झाल्यावर त्यात थोडं तेल मिक्स करा. तेलाने देखील कणीक छान मळून घ्या.

पुरी अगदी टम्म फुगावी यासाठी त्या पिठात तुम्ही थोडा रवा सुद्धा मिक्स करू शकता. रवा मिक्स केल्याने कणीक छान मळली जाते. तसेच पुरीची चवही मस्त लागते.

कणीक मळून झाल्यावर पुढे या पिठाचे बारीक गोळे करून घ्या. पिठाचे बारीक गोळे करून एक एक गोळा घेऊन तो लाटून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही पिठाचे छान गोळे करून पुरी बनवू शकता. तुम्हाला एक एक पुरी करण्यास कंटाळा येत असेल तर तुम्ही गोल चपाती लाटून घेऊ शकता. चपाती लाटून तुम्ही वाटीच्या सहाय्याने याची गोल पुरी बनवू शकता.

पुरी मस्त फुगणे तळण्याच्या पद्धतीवर सुद्धा अवलंबून आहे. पुरी तळताना काही महिला गॅस लो फ्लेमवर ठेवतात. मात्र पुरी टम्म फुगण्यासाठी गॅस लो फ्लेमवर नाही तर हाय फ्लेमवर ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही पुरी बनवू शकता. उद्या दसऱ्या निमित्त घरी श्रीखंड पुरीचा बेत असेल तर तुम्ही अशी पुरी करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Solution: पुण्याची वाहतूक कोंडी कशी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्लान सांगितला

Rohit Pawar News : लाडकी बहीण योजना बंद नव्हे सुरूच ठेवणार; आमदार रोहित पवार यांच्याकडून योजनेचे कौतुक

Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: "महाराष्ट्राला नानाभाऊच मुख्यमंत्री हवेत! लवकरच नानापर्व!"पुण्यात झळकले पटोले यांचे फ्लेक्स

Viral News : वाढीव बिलामुळे नगरसेविका संतापली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात धडकली, अधिकाऱ्यांवर भडकली, VIDEO

SCROLL FOR NEXT