Thick thighs live longer reason saam tv
लाईफस्टाईल

Thick thighs health: मांड्याचा आकार जाड असलेल्या व्यक्ती जास्त जगतात; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Thick thighs live longer reason: वैज्ञानिक अभ्यासानुसार, जाड मांड्या असलेल्या लोकांचं आयुष्य तुलनेने जास्त असते. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल पण यामागे आरोग्याशी संबंधित महत्त्वाचं कारण आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जाड किंवा लठ्ठ असणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. यामुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. जाड दंड, मान किंवा मांडी कमी करण्यासाठी बरेचजण प्रयत्नही करतात. मात्र एका संशोधनानुसार, ज्या व्यक्तींच्या मांड्यांचा आकार जाड आहे त्यांना त्यांना मधुमेह आणि हार्ट अटॅकचा धोका कमी असल्याचं समोर आलं आहे.

नवीन संशोधनातून काय आलं समोर?

हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कोपेनहेगन युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ज्यांच्या मांडी जाड आणि मजबूत असतात त्यांच्यात डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका कमी असतो. या अभ्यासांमध्ये मांडीची जाडी (thigh circumference) हा एक महत्त्वाचा health marker असल्याचं स्पष्ट झालंय.

BMJ मध्ये २००९ साली प्रकाशित झालेल्या Thigh circumference and risk of heart disease and premature death या अभ्यासात असं आढळलं की, ज्यांच्या मांडीचा आकार ६० सेंटीमीटरपेक्षा कमी होता त्यांच्यात हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका जास्त होता. हार्वर्ड आणि कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनात मांडीचे स्नायू (thigh muscles) शरीरातील साखरेचं शोषण (glucose uptake) आणि insulin sensitivity सुधारत असल्याचं दिसून आलं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहून मधुमेहाचा धोका कमी होतो.

संशोधनातून समोर आलेल्या प्रमुख गोष्टी

  • मांडीचे स्नायू ब्लड शुगरचं शोषण करतात. ज्यामुळे टाइप २ डायबिटीजचा धोका कमी होतो.

  • ज्यांच्या मांडीचा आकार जाड असतो अशा लोकांमध्ये chronic inflammation कमी आढळतं.

  • BMJ अभ्यासानुसार, ज्यांच्या मांड्यांचा आकार ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असल्यास हृदयविकार आणि मृत्यूचा धोका वाढतो.

  • मांडीतील फॅट असे हार्मोन्स सोडतात जे शरीरातील हानिकारक visceral fat कमी करतात.

गेल्या काही काळापासून भारतामध्ये मधुमेह आणि हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. या संशोधनातून असं दिसून आलं की, मांडीचे स्नायू मजबूत करणं हा या आजारांपासून बचाव करण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनने ३ तरुणांना उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू; सेल्फी घ्यायला गेले अन्...

Bigg Boss Marathi 6 : मैत्रीत फूट; ९ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

बाप की कसाई? पोटच्या ७ वर्षाच्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकलं; सरपंचपदासाठी नराधमाने ओलांडली क्रूरतेची सीमा!

Maharashtra Live News Update : शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द!

EPFO New Rule: ८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF लिमिट १५००० वरुन ₹२५००० होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT