Paush Putrada Ekadashi  Saam Tv
लाईफस्टाईल

Paush Putrada Ekadashi: जाणून घ्या पौष पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त, पूजा विधी अन् एकादशीचे महत्त्व

Paush Putrada Ekadashi : एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. भारतातील काही भागात पौष पुत्रदा एकादशीला वैकुंठ एकादशी, स्वर्गवाथिल एकादशी किंवा मुक्तकोटी एकादशी असेही म्हणतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paush Putrada Ekadashi 2024 Know Auspicious Timings :

व्रतांमध्ये सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे एकादशीचे व्रत. एकादशीचे नियमित व्रत केल्याने मनाची चंचलता दूर होते आणि धन आणि आरोग्य सौख्य लाभत, असल्याचं सांगितलं जातं. ज्यांना अपत्य होत नाही, अशा लोकांनी पुत्रदा एकादशीचे व्रत करावं. अपत्य होत नसल्यास पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास त्यांना विशेष फलदायी मानली जाते. (Latest News)

पौष पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी पौष पुत्रदा एकादशी २१ जानेवारीला म्हणजेच उद्या साजरी केली जाईल. एकादशी तिथी २० जानेवारीपासून म्हणजेच आज २० जानेवारी संध्याकाळी ७.२६ वाजता सुरू होईल. तर २१ जानेवारीला म्हणजेच रविवारी संध्याकाळी ७.२६ वाजता समाप्त होईल. पौष पुत्रदा एकादशीच्या पारणाचा शुभ मुहूर्त २२ जानेवारीला सकाळी ७.१४ ते ९.२१ पर्यंत असेल. यावेळी पौष पुत्रदा एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. कारण द्विपुष्कार योग, शुक्ल योग आणि रोहिणी नक्षत्राचा संयोग केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पौष पुत्रदा एकादशीची पूजा विधी

जर तुम्ही पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करत असाल तर उपवासाच्या आधी दशमीच्या दिवशी एकदा सात्विक भोजन करावे. व्रत करणाऱ्याने संयम व ब्रह्मचर्य पाळावे. पहाटे अंघोळ झाल्यानंतर व्रत आणि भगवान विष्णूचे ध्यान करण्याचा संकल्प करा. यानंतर भगवान नारायण म्हणजेच विष्णूची गंगाजल, तुळशीची पाने, तीळ आणि फूल पंचामृताने पूजा करावी. उपवास करणाऱ्यांनी व्रताच्या वेळी पाणी देखील घेऊ नये. जर भक्ताची इच्छा असेल तर तो संध्याकाळी दिवा दान करू शकतात त्यानंतर फळांचे खाऊ शकतो. व्रताच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून उपवास सोडावा.

पौष पुत्रदा एकादशी महत्व

'पुत्रदा' शब्दाचा अर्थ 'पुत्र देणारा' असा आहे. ही एकादशी 'पौष' या हिंदू महिन्यात येत असल्याने त्याला 'पौष पुत्रदा एकादशी' म्हटलं जातं. पुत्रदा एकादशी एका वर्षात दोनदा येत असते. पहिली एकादशी पुत्रदा पौष मासमध्ये येते तर दुसरी एकादशी श्रावण मासमध्ये येईल. ज्या जोडप्यांना अपत्य व्हावे अशी इच्छा असते, ते जोडपं या एकादशीचे व्रत करत असतात. जे भाविक मोठी श्रद्धेने आणि भक्तीभावाने या एकादशीचे व्रत करतात त्या भक्तांना भगवान विष्णू त्यांना सुख, समृद्धी देतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. दक्षिण भारतातील काही भागात पौष पुत्रदा एकादशी ही 'वैकुंठ एकादशी', 'स्वर्गवथिल एकादशी' किंवा 'मुक्तकोटी एकादशी' म्हणून साजरी केली जाते.

काय आहे कथा

एके काळी सुकेतू राजाने भद्रावती नगरावर राज्य केले. त्यांच्या पत्नीचे नाव शैव्या होते. मूल न झाल्याने पती-पत्नी दोघेही दु:खी राहत होते. एके दिवशी राजा आणि राणी मंत्र्याच्या हाती राजेशाही सोपवून जंगलात निघून गेले. अपत्य होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्यावेळी ते जीव देणार होते, त्यावेळी राजाच्या मनात आत्महत्या करणं हे पाप असल्याचा विचार आला. त्यावेळी त्यांना वेद पठणाचा आवाज आला त्यानंतर ते त्या आवाजाच्या दिशेने जाऊन लागले. ऋषीमुनींपर्यंत पोहोचल्यावर त्यांना पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व समजले. यानंतर राजा आणि राणीने पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि त्यामुळे त्यांना संतती प्राप्त झाली. यानंतर पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व वाढू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT