Parenting Tips Freepik
लाईफस्टाईल

Parenting Tips: पालकांनो, मुलांच्या बोर्ड परीक्षेसाठी फॅालो करा 'या' टिप्स, मुलं परिक्षेत करतील टॅाप

Parenting Tips for Childrens Board Exam: परीक्षेच्या काळात मुलांना आधार देण्यासाठी पालकांनाही अनेक त्याग करावे लागतात. आजकाल मुलांच्या मनावर अभ्यासाबाबत खूप दबाव असतो. त्यामुळे मुलांना परीक्षेच्या दबावाची भीती वाटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परीक्षा मुलांसाठी असल्या तरी पालकांनाही तयारी करावी लागते. मुलांच्या बोर्ड परीक्षांसाठी आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. येणारे एक-दोन महिने मुलाचे भविष्य ठरवतील. कारण या एक-दोन महिन्यांच्या अभ्यासात मुलं बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतात.

आजकाल मुलांच्या मनावर अभ्यासाबाबत खूप दबाव असतो. त्यामुळे मुलांना परीक्षेच्या दबावाची भीती वाटते. ज्यामुळे मुले परीक्षापू्र्वीच भीतीच्या वातावरणात राहतात. पालकांनी त्यांच्या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी असे वातावरण निर्माण करावे की मुलांना अभ्यासाचा जास्त ताण येऊ नये.

मुलांना तुमचा वेळ द्या

तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी, तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्कीच थोडा वेळ घालवला पाहिजे. यामुळे त्यांना तुमची उपस्थिती नेहमीच जाणवेल. या काळात, तुमच्या दोघांमधील संबंध अधिक चांगले होतील. त्यांना परीक्षेच्या ताणातून थोडा ब्रेकही मिळेल.

या गोष्टीपासून मुलांना दूर ठेवा

मुलांना अभ्यासाचा खूप लवकर कंटाळा येतो. यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांच्या अभ्यासासाठी चांगले वातावरण निर्माण केले पाहिजे. अभ्यास करताना, स्मार्टफोन, व्हिडिओ गेम, टॅबलेट इत्यादी सर्व ध्यान भटकवणाऱ्या गोष्टी मुलाच्या अभ्यासाच्या टेबलावरून काढून टाकल्या पाहिजेत. याशिवाय त्यांच्या खोलीत आरामदायी खुर्ची आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था असावी.

मुलांवर दबाव आणू नका

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगले गुण मिळावेत असे वाटते. पण चांगले गुण मिळवण्याच्या इच्छेने मुलावर दबाव आणू नये. याचा मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय, पालकांनी बोर्ड परीक्षेदरम्यान आपल्या मुलांना जास्त प्रश्न विचारणे टाळावे. याचा मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. पालकांकडून विचारल्या जाणाऱ्या जास्त प्रश्नामुळे मुलांमध्ये तणाव निर्माण होतो.

मुलांच्या समस्या ऐका

बोर्ड परीक्षेची तयारी करताना मुलं सतत अभ्यास करत राहतात. ज्यामुळे मुलं त्यांच्या मित्रांनाही भेटू शकत नाहीत. अशावेळी प्रत्येक पालकाला मुलाच्या समस्या माहित असायला हव्यात. जर तुम्ही मुलांना त्यांच्या समस्या ऐकल्या किंवा विचारल्या तर त्यांना बरे वाटेल. जे त्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics: संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंची गाडी कुणाच्या नावावर ? अंबादास दानवेंचा सवाल|VIDEO

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं भाजपचं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT