Skin Care Tips: चमकदार चेहऱ्यासाठी घरीच तयार करा पपईचा फेस पॅक; डाग होईल कमी, स्कीनवर येईल ग्लो

Papaya Homemade Face Pack for Glowing Skin: पपई आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपई खाण्यासोबतच त्वचेवर लावल्यानेही अनेक फायदे होतात. जाणून घ्या.
Papaya Face Pack
Papaya Face Packyandex
Published On

पपई हे एक असे फळ आहे जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. हे जीवनसत्त्वे, आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे शरीराला आतून मजबूत करण्यास तसेच त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. पपई खाण्यासोबतच त्वचेवर लावल्यानेही अनेक फायदे होतात. पपई आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी कशी फायदेशीर आहे आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल. जाणून घ्या.

त्वचेसाठी पपईचे फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. यामध्ये असलेले पपेन हे एन्झाइम पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आणि वजन कमी करण्यास मदत करते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळवण्यास, डाग कमी करण्यास आणि सुरकुत्या रोखण्यास मदत करतात. पपईमध्ये असलेले पपेन एन्झाइम त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

चमकदार त्वचेसाठी पपईचा वापर कसा करावा

पपईचा फेस मास्क

पपईचा फेस मास्क बनवण्यासाठी, पिकलेल्या पपईचा गर काढा आणि तो चांगला मॅश करा. त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर थंड पाण्याने धुवा. हा मास्क त्वचेला चमकदार बनवण्यास तसेच डाग कमी करण्यास मदत करेल.

पपई आणि दह्याचा पॅक

पपईच्या गरामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि २० मिनिटांनी धुवा. हे पॅक त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि चमकदार करण्यास मदत करते.

पपई आणि कोरफड जेल

पपईच्या गरामध्ये कोरफडचे जेल मिक्स करुन पॅक तयार करा. हे चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. हे पॅक त्वचेला हायड्रेट करण्यास आणि ती कोमल बनवण्यास मदत करते.

Papaya Face Pack
Valentine's Day 2025: व्हॅलेंटाइन डे करा खास, बॅायफ्रेंडला द्या 'हे' स्पेशल गिफ्ट्स

पपई तेल

पपईच्या बियांपासून काढलेले तेल देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होते आणि डाग कमी होतात.

पपई वापरण्यापूर्वी खबरदारी घ्या

पपई वापरण्यापूर्वी, तुमच्या त्वचेला त्याची एलर्जी नाही याची खात्री करा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा कोणत्याही प्रकारची स्कीन एलर्जी असेल तर पपईचा मास्क लावण्यापूर्वी १० मिनिटांचा पॅच टेस्ट करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Papaya Face Pack
Side Effects Of Waxing: वॅक्सिंगमुळे त्वचेला होतील 'हे' मोठे नुकसान, अशी घ्या काळजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com