Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : आई-वडिलांच्या चुकीच्या सवयींमुळे मुले जाऊ शकतात डिप्रेशनमध्ये, वेळीच घ्या काळजी

Parents Behavior Affecting Child : वाढत्या वयात मुलांना योग्य वळण लागावे असे प्रत्येक पालकांचे मत असते. बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली प्रत्येक पालक कामानिमित्त व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना मुलांकडे पुरेसे असे लक्ष देता येत नाही.

कोमल दामुद्रे

Childhood Trauma :

वाढत्या वयात मुलांना योग्य वळण लागावे असे प्रत्येक पालकांचे मत असते. बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली प्रत्येक पालक कामानिमित्त व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना मुलांकडे पुरेसे असे लक्ष देता येत नाही.

मुलांच्या बालपणीचा काळ हा अतिशय सुंदर असतो. या काळात मुलांना कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा ताण नसतो. परंतु, यातही काही मुले असे असतात ज्यांचा बालपणीचा अनुभव हा अतिशय दु:खी आणि कष्टी असतो. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. आई-वडिलांच्या काही चुकांमुळे मुलांना ताण (Stress) येतो. त्यांच्या कोवळ्या मनावर परिणामही होतो. जाणून घेऊया त्याबद्दल.

1. भावनिक आणि शारीरिक वेदना

ज्या वेळी मुलांचे (Child) भावनिक आणि शारीरिक शोषण होते तेव्हा त्यांच्या मनावर या गोष्टींचा परिणाम होतो. यामुळे मुले सतत शांत राहातात. त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटू लागते.

2. मर्यादा

पालकांनी (Parents) मुलांसाठी काही गोष्टींची मर्यादा सेट करायला हवी. काय बरोबर काय चुक यामध्ये त्यांनी गोंधळून जायला नको. यासाठी पालकांनी आधीच खबरदारी घ्यायला हवी. ज्यामुळे मुलांना शिस्त लागते. मुलांच्या मनातील असुरक्षिततेची भावना नाहीशी होते.

3. कुटुंबातील वातावरण

मुलांच्या योग्य विकासासाठी कुटुंब खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालकांचे विभक्त होणे किंवा त्यांच्यातील भांडणे मुलांच्या मनावर आघात करतात. तसेच आई-वडिलांच्या घटस्फोटाचा मुलांवर परिणाम होतो. पालकांनी त्यांच्या नात्याचा मुलावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी

4. मुलांकडे दुर्लक्ष नको

पालक झाल्यानंतर स्वत:कडे लक्ष देण्यात काही चुकीचे नाही. परंतु, यामुळे मुलांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. यामुळे मुलांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. तुमच्या अशा वाग्यामुळे मुले लांब जाऊ शकतात. तसेच पालकांनी मुलाच्या गरजा आणि आनंदावर लक्ष केंद्रित करा. त्यांच्याशी बोला, त्यांचे ऐका

5. गुंडगिरी करणे

घरातल्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे शाळेत किंवा घरी ते गुंडगिरी करतात. उलट बोलणे किंवा मोठ्यांवर राग दाखवणे यांसारख्या गोष्टी ते करतात. शाळेत भांडणे करणे किंवा कारण नसताना इतरांना मारण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होते. अशावेळी पालकांनी वेळीच काळजी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT