Parenting Tips yandex
लाईफस्टाईल

Parenting Tips: तुमच्या मुलांना लहानपणापासूनच शिकवा चांगल्या आणि वाईट मित्रांमधील फरक

Friendship Tips for Childrens: तुम्हालाही तुमच्या मुलांना यशस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनवायचं असेल तर त्यांना योग्य आणि अयोग्य मित्रांमध्ये फरक करायला शिकवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांचे संगोपण करताना पालकांनी मुलांच्या प्रत्येक गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्व पालकांना आपली मुलं चांगल्या लोकांसोबत वाढावे असे वाटते. जेणेकरुन त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि सवयी विकसित होतात. चांगल्या संगतीमुळे मुलांचे व्यकितमत्व सुधारते आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवरही चांगला प्रभाव पडतो. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना आयुष्यात यशस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ति बनवायचे असेल तर आणि त्याला वाईट संगतीपासून दूर ठेवायचे असेल तर त्याला लहानपणापासूनच मैत्रीचे काही नियम नक्की सांगा.

मित्रांमधला फरक समजावा

मुलांना समजावून सांगा कि प्रत्येक व्यक्ती एक सारखी नसते. त्याचप्रमाणे सर्व मित्र सुद्धा एक सारखे नसतात.तुमच्या मित्रांची सवयी, विचार आणि आवडी निवडी तुमच्यापेक्षा वेगळी असू शकतात. अशावेळी त्यांच्यावर रागवण्याऐवजी त्यांचा आदर करायला शिकवा.

इच्छांचा आदर करायला शिकवा

तुमच्या मुलांना समजावून सांगा कि चांगले मित्र नेहमी एकमेकांच्या भावना समजतात. ते आपली इच्छा दुसऱ्या मित्रांवर लादत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा सवय आवडत नसेल तर तुमचा मित्राला तुमची भावना कळेल आणि तो ती गोष्ट तुमच्या समोर करणार नाही.

गैरवर्तन करणाऱ्या मित्रांपासून दूर राहा

जर तुमच्या मुलाला त्याचा एखादा मित्र त्रास देत असेल किंवा दररोज त्याच्यासोबत गैरवर्तन करत असेल तर त्याला त्याच्यासोबत मैत्री तोडायला सांगा. मुलांना समजावून सांगा की एक चांगला मित्र त्याचा जिवलग मित्रासोबत असे कधीच वागणार नाही. त्याला कधीच चुकीची वागणूक देणार नाही.चांगले मित्र नेहमी आपल्या मित्रांच्या भावनांची काळजी घेतात.

खरा मित्र नेहमी प्रेरित करतो

मुलांवर रागवण्याऐवजी पालक म्हणून तुम्ही मुलांना नेहमी समजावून सांगा. त्याना सांगा की, एक चांगला मित्र त्याच्या मित्राला नेहमी चांगल्या कामासाठी प्रेरित करतो. त्याला वाईट आणि चांगल्या गोष्टींमधला फरक सांगतो. त्याच्या वाईट कामात कधीच त्याची साथ देत नाही. याशिवाय आपल्या मित्राला नेहमी आत्मविश्वासाने जगायला शिकवतो. पण काही असे ही मित्र असतात जे तुमच्यातील नकारात्मक भरुन काढम्याच काम करतात. अशा मित्रांपासून नेहमी दूर राहावे.

समस्या सोडवण्यास मदत करतात

तुमच्या मुलांना सांगा की, एक चांगला मित्र नेहमी एकमेकांच्या समस्या सोडवण्यास मदत करतात. तसेच एक चांगला मित्र नेहमी त्याच्या मित्राच्या वाईट काळात त्याची मदत करतो. तसेच त्याचे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जर एखादा मित्र तुम्हाला संकटात पाहून आनंद घेत असेल तर त्यापासून दूर राहायला शिकवा.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT