Stress in Children Saam Tv
लाईफस्टाईल

Stress in Children : लहान मुलांनाही स्ट्रेस येतो; पुढील लक्षणे दिसताच हा उपाय सुरू करा

Stress in Children Symptoms : तुमचं मुलं सुद्धा प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे का? कसं ओळखायचं वाचा सविस्तर.

Ruchika Jadhav

सध्याच्या बदलत्या युगात आजकालची लहान मुलं वेगळ्या स्वभावाची झाली आहेत. मुलांकडे लहानपणापासून हातात फोन असतो. फोन आणि विविध इलेक्ट्रीक गॅजेट आणि गेम्स वापरणे मुलांना फार आवडते. मात्र त्याने त्यांच्या स्वभावात बदल होत चालला आहे. त्यामुळे मुलं फार लवकर स्ट्रेसमध्ये आणि तणावात येतात. अशात मुलांमधील स्ट्रेस जास्त वाढल्याने ते कसे वागतात आणि त्यांचा स्ट्रेस दूर कसा करायचा याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

ओव्हर सेंसिटिव्ह

स्ट्रेसमध्ये असलेली मुलं फार ओव्हर सेंसिटिव्ह असतात. त्यांना प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वाईट वाटते. विविध गोष्टी त्यांच्या मनाला लागतात.

चिडचिडेपणा

स्ट्रेस वाढल्याने मुलांचा चिडचिडेपणा सुद्धा जास्त वाढतो. मुलं सतत ओरडून आणि मोठ्याने बोलण्यास सुरुवात करतात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी कंफर्टेबल वाटत नाही.

अटेंशन

जी मुलं स्ट्रेसमध्ये असतात त्यांना स्वत:साठी अटेंशनची गरज असते. त्यांना सतत आपल्याला अटेंशन मिळावं असं वाटत असतं. अशी मुलं आरडा ओरडा करून सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात.

कमी व्यक्तींमध्ये मिसळणे

स्ट्रेस वाढल्याने मुलं काही दिवसांनी असा विचार करू लागतात की, मला कोण काही बोलेल किंवा वाद झाले तर. त्यामुळे ते जास्त व्यक्तींमध्ये जाणे टाळतात. तसेच कमी व्यक्तींमध्ये मिसळणे पसंत करतात.

या पद्धतीने मुलांचा स्ट्रेस दूर करा

मुलांना परफेक्ट होण्यासाठी दबाव आणू नका. मुलांना जास्तीचे क्लास आणि अॅक्टीवीटी लावू नका. मुलांना सतत आउट डोअर गेम्स खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना दीर्घ श्वासाच्या एक्ससाइज करण्यासाठी सांगा. मुलांशी खुप जास्त गप्पा मारा आणि त्यांना सतत हे सांगा की मी कायम तुमच्याबरोबर आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव रद्द; आवाजी मतदानाने फेटाळला प्रस्ताव

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

SCROLL FOR NEXT