CHILD MOBILE ADDICTION 5 EFFECTIVE WAYS TO REDUCE SCREEN TIME saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips: लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? 'या' 5 उपायांनी दूर होईल स्क्रीन पाहण्याची सवय

Child’s Mobile Addiction : आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईल आणि स्क्रीनचे व्यसन ही एक मोठी समस्या बनली आहे. अचानक त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतल्यास अनेकदा ती मुले रडू लागतात. या लेखात आम्ही पालकांसाठी ५ सोप्या पण प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत, ज्यातून स्क्रीन पाहण्याचा वेळ कमी होईल.

Bharat Jadhav

  • लहान मुलांमध्ये मोबाईल आणि स्क्रीनचा वाढता वापर पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

  • मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी ठराविक वेळेचे नियम तयार करणे उपयुक्त ठरू शकते.

  • मोबाईल अचानक काढून घेण्याऐवजी हळूहळू स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करता येतो.

आजकाल लहान मुलांनाही मोबाईलशिवाय करमत नाही. अनेकदा ते मोबाईलवर कार्टून्स पाहतच जेवण करतात. मोबाईल त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मोबाईलशिवाय त्यांच्या आयुष्यच काहीच महत्त्वाचं नाहीये, फोन मिळाला नाही तरीही ते बेचैन होत असतात. फोन, टॅब्लेट किंवा टीव्हीच्या अतिवापरामुळे घरात अनेकदा वाद होतात. त्यांच्याकडून मोबाईल काढून घेताच ते रडू लागतात. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवायचे असेल, तर हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, त्यांच्यावर ओरडण्याऐवजी प्रेम आणि मजेशीर उपक्रमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांची स्क्रीन पाहण्याची सवय मोडून काढू शकतात.

स्क्रीन टाइमसाठी एक वेळापत्रक निश्चित कर

मुलांनी जेव्हा वाटेल तेव्हा टीव्ही पाहणे किंवा फोन वापरणे सुरू केले, तर त्यांच्या स्क्रीन टाइमवर मर्यादा घालणे कठीण होत असते. म्हणूनच, दिवसातून स्क्रीन वापरण्यासाठी दोन किंवा तीन विशिष्ट वेळा निश्चित करा. उदाहरणार्थ, दुपारच्या जेवणानंतर ३० मिनिटे किंवा गृहपाठ पूर्ण केल्यानंतर ४५ मिनिटे. मुलांना मोबाइल कधी मिळणार हे आधीच सांगून द्या.

तुम्ही जेवण, खेळणे, अभ्यास आणि स्क्रीनचा वापर यांच्या वेळा दर्शवणारे एक साधे वेळापत्रकही तयार करू शकता. यामुळे, फोन हिरावून घेतला जात आहे असे मुलाला वाटणार नाही. उलट त्यांची ठरलेली स्क्रीन टाइमची वेळ कधी येणार आहे, याची त्यांना नेमकी कल्पना असेल.

अचानक फोन हिसकावून घेऊ नका

मुले जेव्हा एखादा व्हिडिओ किंवा गेम पाहण्यात मग्न असतात, तेव्हा फोन अचानक बंद केल्यास त्यांना राग येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्यांचा 'स्क्रीन टाइम' संपण्यापूर्वी त्यांना हळूहळू कल्पना द्या. सुरुवातीला त्यांना सांगा की अजून १० मिनिटे बाकी आहेत. त्यानंतर, ५ मिनिटे आणि शेवटी २ मिनिटे शिल्लक असताना त्यांना सूचना द्या. यामुळे त्यांचे मन दुसऱ्या गोष्टीत लागेल.

घरात मोबाईलसाठी नियम तयार करा

स्क्रीनचा वापर कमी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण घरासाठी नियम करण्याची गरज नाही. पण त्याऐवजी विशिष्ट जागा आणि वेळांपासून सुरुवात करा. म्हणजेच जेवणाच्या टेबलावर फोन न वापरणे, बेडरूममध्ये स्क्रीनचा वापर न करणे, तसेच झोपेतून उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी काही काळ फोनपासून दूर राहावे, असे काही नियम बनवा. मात्र हे नियम बनवताना एक काळजी घ्या की हे नियम मुलासाठी शिक्षा वाटू देऊ नका. ते संपूर्ण कुटुंबासाठीचे नियम बनवा. जर पालकांनीही जेवणाच्या वेळी आपले फोन दूर ठेवले, तर मुलाला या नियमाचे पालन करणे सोपे जाईल.

'स्क्रीन टाइम'ला पर्याय म्हणून काही मजेशीर गोष्टी करायला लावा

जर तुम्ही मुलाला केवळ टॅब्लेट बाजूला ठेवायला सांगितले आणि त्याऐवजी दुसरे काहीही करायला दिले नाही, तर ते पुन्हा स्क्रीनकडे वळू शकतात. म्हणूनच त्यांना इतर उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही मुलांना कोडी, चित्रकला, रंगकाम, ब्लॉक्स किंवा बोर्ड गेम्स, चेंडूचे खेळ किंवा साध्या हस्तकलेच्या कृतींमध्ये सहभागी करून घेऊ शकता. मणी वेगळे करणे, चित्र काढणे किंवा खेळणी आवरून ठेवणे यांसारखे उपक्रम लहान मुलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. पुढचा उपक्रम मुलासाठी मजेशीर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून स्क्रीनपासून दूर जाणे ही शिक्षा वाटणार नाही.

मुलांना स्टेप बाय स्टेप स्क्रीनपासून दूर करा

स्क्रीन पाहण्याची वेळ कमी केल्यावर मुलांनी अस्वस्थ होणे, रडणे किंवा हट्टीपणा करणे ही एक सामान्य बाब आहे. अशा वेळी त्यांच्या रागाची दखल घ्या, परंतु ठरवलेले नियम वारंवार बदलू नका. जर तुम्ही त्यांच्या रडण्यामुळे स्क्रीन पाहण्याची वेळ वाढवली, तर ते रडल्यामुळे आपल्याला मोबाइल वापरायला मिळतो अस म्हणत ते याचा उपयोग दबाव टाकण्यासाठी करतील.

पालकांनी सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचं

मुलांच्या स्क्रीन वापरण्याच्या सवयी एका रात्रीत बदलणार नाहीत. सुरुवातीला ते कदाचित विरोध करतील; परंतु जर स्क्रीन-टाइमचे नियोजन केले.डिव्हाइस बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना दिली आणि त्यानंतर मनोरंजक पर्याय उपलब्ध करून दिले, तर हळूहळू ही गोष्ट त्यांच्या नवीन जीवनशैलीचा एक भाग बनू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना व्हायरल इन्फेक्शन

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

भाजप नेत्याचं शिंदेसेनेला खळबळजनक पत्र; मित्रपक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी

SCROLL FOR NEXT