Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips: पालकांनो, मुल सतत मोबाईल पाहतात, हट्टी झालीये? कसा सोडवाल स्क्रीनचा नाद

Child Mobile Addiction : वाढत्या डिजिटल युगात पालक जितक्या मोबाईलच्या आहारी गेले आहेत त्याच्या दुप्पट मुलं गेले आहेत.

कोमल दामुद्रे

Parenting Tips For Screen Addiction : वाढत्या डिजिटल युगात पालक जितक्या मोबाईलच्या आहारी गेले आहेत त्याच्या दुप्पट मुलं गेले आहेत. मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे. शाळा, कॉलेजच्या वयात मुलांना अधिक व्यसन जडले आहेत ते मोबाईलचा.

घरातील इतर मंडळी मोबाईल समोर असल्यामुळे मुलांना देखील स्क्रीन टाइमचे वेड लागले आहे. एकदा का याचे व्यसन जडले की ते सुटता सुटत नाही. मुलांना खाण्यापासून ते खेळण्यापर्यंत सतत मोबाईल हातात हवा असतो. तो दिला नाही की त्यांचा हट्टीपणा अधिक वाढतो. परंतु, अशा परिस्थितीत पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे जाणून घेऊया

1. व्यसन नको

मुलांना (Child) व्यस्त ठेवण्यासाठी किंवा त्यांना खायला घालण्यासाठी, पालक (Parents) अनेकदा त्यांना मोबाईल फोन देतात. असे करणे चुकीचे आहे. त्यांच्या हातात एकदा का मोबाईल दिला की, त्यांना त्यापासून दूर ठेवणे कठीण असतो.

2. पॅरेंटल लॉक सेट करा

लहान वयातच मुले मोबाईल (Mobile) चालवायला शिकतात, जरी त्यांना एबीसी माहित नसले तरी शब्द किंवा नमुन्यांचे आकार त्यांच्या मेंदूवर उमटतात आणि ते स्वतःच सर्वकाही शिकतात. म्हणूनच मोबाईलला फिंगरप्रिंट लॉक लावणे आणि प्रत्येक अॅपमध्ये पॅरेंटल लॉक ठेवणे आवश्यक आहे जे मूल उघडू शकत नाही.

3. व्हिडिओ दाखवा

मुले मोबाईलवर व्हिडिओ पाहतात, तेव्हा स्वतः रिमोट घ्या आणि मुलांसाठी मोबाइलचे दुष्परिणाम समजावून सांगणारा कार्टून व्हिडिओ टाका, जेणेकरून मुले जागरूक होतील आणि कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा विचार करतील.

4. मारू नका

लहान मुले मोबाइल किंवा टीव्ही पाहत असताना त्यांच्याकडून लगेच मोबाइल हिसकावून घेऊ नका किंवा टीव्ही बंद करू नका. अशा परिस्थितीत ते आक्रमक होऊ शकतात किंवा त्यांच्या मनात निराशा येते, ज्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. अशा वेळी त्याच्याकडे जा आणि प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहा आणि म्हणा की पुढच्या पाच-दहा मिनिटांनी मोबाईल ठेवा किंवा टीव्ही बंद करा. त्या दहा मिनिटांत, ते स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करतात की स्क्रीन टाइम संपणार आहे आणि नंतर शांतपणे दहा मिनिटांनी तो बंद करण्यास तयार होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT