Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमची मुलं सुद्धा होतील अभ्यासू; 'या' पद्धतीने लावा वाचनाची सवय

Parenting Tips For Develop Reading Habits : आपल्या मुलांनी चांगलं शिकावं आणि मन लावून अभ्यास करावा. वर्गात सर्वात प्रथम त्यांचाच नंबर यावा असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यामुळे पालक मुलांना अभ्यास करण्यासाठी सक्ती सुद्धा करतात.

Ruchika Jadhav

लहान मुलांसाठी अभ्यास म्हणजे मोठा शत्रू असतो. त्यांना अजिबात वाचन आवडत नाही. लहान मुलांना शाळेतील अभ्यास पूर्ण करणे हे एकचं मोठं काम असतं. मात्र यापासून मुलं सतत दूर पळत असतात. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं आणि मन लावून अभ्यास करावा. वर्गात सर्वात प्रथम त्याचाच नंबर यावा असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यामुळे पालक मुलांना अभ्यास करण्यासाठी सक्ती सुद्धा करतात.

सक्ती केल्याने मुलांच्या मनात पालकांविषयी राग निर्माण होतो. तर अनेकदा मुलांच्या मनात पालकांबद्दल वाईट समज निर्माण होतात. यामुळे मुलं अभ्यासासह पालकांपासून सुद्धा दूर जाण्याची शक्यता असते. पालकांसमोर मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे मोठे आव्हान असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत.

मोठ्या अक्षरांची पुस्तके

जर तुमच्या मुलांना वाचन अजिबात आवडत नसेल तर त्यांना याची आवड लागण्यासाठी मोठ्या अक्षरांची पुस्तके घ्या. मोठ्या अक्षराची पुस्तके असल्यास मुलांना वाचन सोप्पे जाते. तसेच मुलांना या अक्षरांची गोडी लागते. लहान अक्षरे स्पष्ट दिसत देखील नाहीत. त्यामुळे मोठ्या अक्षरांची पुस्तके तुम्ही वाचनासाठी घेतली पाहिजेत.

मुलांसमोर तुम्ही फोन वापरू नका

अनेक मुलांना सतत फोनवर गेम खेळण्याची सवय असते. गेम खेळणाऱ्या मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पालकांनी आपली फोनची सवय सोडून दिली पाहिजे. सतत फोन वापरल्याने मुलं देखील हेच पाहतात आणि त्यांना सुद्धा सतत फोन वापरावा वाटतो. त्यामुळे तुम्ही मुलांसमोर फोन वापरणे बंद केले पाहिजे.

दबाव टाकू नका

प्रत्येक लहान मुलांची आकलन क्षमता वेगळी असते. त्यामुळे मुलांवर कोणताही दबाव आणू नका. लहान मुलांना अभ्यासाची गोडी हळूहळू लागते. एकदम त्यांच्यावर दबाव टाकू नका.

पालकांची मदत

लहान मुलं म्हणजे एक रिकामी आणि कोरी पाटी असते. त्यामुळे लहान मुलांना कोणतीही गोष्ट शिकवण्यासाठी पालकांनी स्वत:हून त्यांना सर्व काही शिकवले पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी स्वत: त्यांना विविध गोष्टी शिकवल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT