Memory Booster Food Saam Tv
लाईफस्टाईल

Memory Booster Food : मुलांच्या गोष्टी लक्षात राहात नाहीये? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश

Shraddha Thik

Food For Memory Boost :

लहान मुलं खूप जास्त चंचल असतात. ते पटकन कोणतीही गोष्ट विसरतात. त्यांना कितीही वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी ते विसरतात. त्यांची बुद्धी त्यांच्या वयानुसार काम करत असते. त्यामुळे ते असं वागतात. परंतु ही सवय (Habit) मोठेपणी घातक ठरु शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान मुलं परिक्षेच्या काळात खूप जास्त प्रेशर घेतात. अनेकदा मुले जे वाचतात ते लगेच विसरतात अशी तक्रारदेखील असते. त्यामुळे ऐन परिक्षेच्या काळात गोंधळ उडतो. परिणामी मुलांना परिक्षेत कमी मार्क मिळतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांच्या आहारात (Diet) पौष्टिक गोष्टींचा समावेश करायला हवा. मुलांची स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा.

बेरी

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी बेरी फायदेशीर असतात. बेरी खालल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मेंदूच्या पेशींसाठी फायदेशीर (Benefits) असते. ब्लुबेरी, स्ट्रॉबेरीमध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

धान्य

ब्राउन राईस, गहू, ब्रेड शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. हे खालल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता भासत नाही. यामुळे खूप जास्त एनर्जी मिळते. कामातील एकाग्रता वाढते. त्यामुळे लहान मुलांना घरातील सकस आहारा भाजी, चपाती, वरण भात द्यावे.

दूध

दूध हे शरीरासाठी फायदेशीर असते. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. तसेच मुलांच्या वाढीसाठी दूध पिणे आवश्यक असते. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.

पालेभाज्या

पालक, ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्यांपासून शरीराला खूप पोषक तत्वे मिळतात. पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि मिनरल असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स हे शरीरासाठी खूप चांगले असतात. यात फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई असे पोषक तत्वे असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढीस मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT