Parenting Tips, What Is Best Time To Study  Saam Tv
लाईफस्टाईल

Study Time : मुलांनो, अभ्यास करण्याची ही असते योग्य वेळ? या वेळी अभ्यास केल्यास कधीच येत नाही अपयश

What Is Best Time To Study : सध्या बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु आहे. लवकरच दहावी आणि वार्षिक परीक्षा सुरु होतील. अशावेळी मुलांना अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण येतो. ज्यामुळे त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Child Study Time :

सध्या बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु आहे. लवकरच दहावी आणि वार्षिक परीक्षा सुरु होतील. अशावेळी मुलांना अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण येतो. ज्यामुळे त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

अभ्यास करताना मूल जे काही वाचतात ते त्यांना आठवत आहे की, नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी (Parents) मुलांच्या अभ्यासासाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्या शिकण्यावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. अभ्यास करण्यासाठी त्यांचे मन आणि शरीर एकाग्र होते. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या वेळी अभ्यास करायला सांगायला हवे. अभ्यास करण्याची देखील योग्य वेळ (Time) असते का जाणून घ्या.

1. सकाळी १० ते दुपारी २

स्टडीनुसार, मेंदूचे कार्य हे सकाळी शिकण्यासाठी आणि सर्वाधिक माहिती गोळा करण्यासाठी चांगले असते असे म्हटले जाते. यावेळी मेंदू सर्वात जास्त सतर्क असतो. ज्यामुळे त्याची शिकण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

2. आहार महत्त्वाचा

मुले अभ्यास करण्यापूर्वी कोणते पदार्थ (Food) खातात किंवा पालकांनी त्यांना कोणते पदार्थ खाऊ घालावे हे देखील अधिक गरजेचे आहे. सकाळी पौष्टिक नाश्ता खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. त्यासाठी मुलांच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

3. दुपारीची वेळ महत्त्वाची

दुपारी ४ ते रात्री १० च्या वेळी मेंदू अधिक सक्रिय राहातो. हा वेळ अभ्यासासाठी अधिक महत्त्वाचा ठरु शकतो. अभ्यासापूर्वी मुलांना आराम करायला वेळ द्या. संध्याकाळच्या वेळी हलका आणि पौष्टिक नाश्ता खायला द्या. ज्यामुळे अभ्यास करताना त्यांना झोप येणार नाही.

4. रात्रीचे जेवण

मुलांच्या रात्रीच्या जेवणात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे पदार्थ जसे की, फॅटी फिश किंवा फ्लॅक्स सीड्सचा समावेश करा. यामुळे मेंदू निरोगी राहाण्यास मदत होईल तसेच मुलांची बौद्धिक क्षमता वाढेल. याशिवाय मुले जर पहाटे ४ ते ७ च्या वेळेस अभ्यास करत असतील तर ते टाळावे. कारण यावेळी शरीर झोपेत असते. ज्यामुळे अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT