घरातील काही गोष्टींमुळे किंवा पालकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यात आपापसात भांडणे होतात. जे की सामान्य गोष्ट आहे. मात्र ही भांडणे मुलांसमोर करणे त्यांच्या मानसिक (Mental Health ) आरोग्यासाठी धोक्याची ठरतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर भांडणे टाळावे.
मलांच्या मनावर वाईट परिणाम
पालक जर नियमित आपल्या मुलांसमोर भांडण (Parental Conflicts) करत असतील तर, याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Children Mental Health ) होतो. काही पालक तर आपल्या वादात मुलांना देखील घेतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे मुलांच्या मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असेच सुरू राहिल्यास पालक आणि मुलं यांच्यातील विश्वास आणि जवळीक कमी होते. पालकांच्या भांडणामुळे मुलामध्ये चिंता, नैराश्य, राग भावना वाढते. ज्यामुळे त्यांची देहबोलीत फरक पडतो. तसेच मुलांचा मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास (Confidence )कमी होतो.
नातेसंबंधांविषयी वाईट परिणाम
पालकांची रोजची भांडणे पाहून मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्यांचे नातेसंबंधांविषयी मत बदलतात. ते खूप नकारात्मक विचार करू लागतात. लग्न संस्थेवरून त्यांचा विश्वास उडतो. तसेच यामुळे मुलं एकटी पडत जातात. तसेच त्यांना चारचौघात वावरताना त्रास होतो. ते लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही. तसेच बाहेर समाजात भांडणाच्या भीतीने आपले मत मांडणार नाही.
पालकांनी मुलांसमोर भांडण कसे टाळावे?
जोडीदाराचा राग आला असेल आणि मुलं आपल्या समोर असेल तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
पालकांनी एकमेकांशी मोठ्या आवाजात उद्धटपणे बोलणे टाळा.
मुलांसमोर एकमेकांविषयी वाईट बोलू नका.
मुलांसमोर एकमेकांवरून चिडचिड करू नका.
तसेच लहान मुलांसमोर एकमेकांच्या आईवडिलांविषयी किंवा नातेवाईकांविषयी वाईट बोलू नका. यामुळे मुलं देखील तो विचार करतील.
मुलांसमोर नेहमी शांत आणि प्रेमळ स्वभाव ठेवा.
पैशांवरून मुलांसमोर भांडणे करू नका.
जर तुम्हाला त्या क्षणी तो विषय भांडून किंवा बोलून सोडवायचा आहे, पण मुलं समोर असल्यास त्याला बाहेर खेळायला पाठवा. पण त्याच्या समोर भांडू नका.
पालकांनी नातं तोडण्याची भाषा मुलांसमोर करू नये. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. त्यांच्या मनात असुरक्षित भावना येते.
तुम्ही पालक आहात हे कधीच विसरू नये. कारण मुलांवर योग्य संस्कार करणे आणि त्यांची काळजी घेणे हे पालकांची जबाबदारी आहे.
पालकांनी आपल्या वादात मुलांना घेऊ नये. तसेच वाद झाल्यावर मुलांना मध्यस्थी ठेवून एकमेकांशी संवाद साधू नये.
पालकांनी आपल्यातील वादाची चाहूल मुलांना लागू देऊ नये.
मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे आणि नियमित मुलांशी संवाद साधावा.
मुलांच्या मनातील गैरसमज, मतभेद ऐकून ते दूर केले पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.