Papaya Side Effects
Papaya Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Papaya Side Effects : थांबा ! पपईचे सेवन करताय, होऊ शकते 'ही' गंभीर समस्या

कोमल दामुद्रे
Papaya

चवीला गोड, शरीराला पोषक व त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईही अनेक आजारांवर बहुगुणी ठरली जाते. पपईमध्ये अनेक पोषकत्त्व आहे.

Papaya Benefits

जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले पपई हे असे फळ आहे जे वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असते. याच्या सेवनाने वजन सहज कमी करता येते. शिवाय, पपई हे मधुमेह (Diabetes), हृदय आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर फळ आहे.

Papaya

फळ म्हणून खाण्याव्यतिरिक्त, ते सलाड आणि रस म्हणून देखील वापरले जाऊ शकते. इतके फायदे असूनही पपईचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे सेवन करताना योग्य प्रमाणात काळजी घ्या

pregnancy

1. गर्भधारणेदरम्यान

गर्भवती (pregnancy) महिलांनी पपईचे सेवन अजिबात करू नये. कारण कच्च्या किंवा अर्ध्या पिकलेल्या पपईमध्ये लेटेक्स आणि पपेन असतात जे न जन्मलेल्या बाळासाठी हानिकारक असतात. यामुळे प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते.

Kidney Stone

2. किडनी स्टोन मध्ये

किडनी स्टोनच्या रुग्णांनीही पपईचे सेवन करू नये. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्याच्या जास्त प्रमाणात स्टोनची समस्या वाढू शकते. पपई खाल्ल्याने कॅल्शियम ऑक्सलेटची परिस्थिती उद्भवू शकते, किडनीमध्ये स्टोन देखील मोठा होऊ शकतो.

allergy

3. कोणतीही ऍलर्जी असताना

पपईचे सेवन अशा लोकांसाठी देखील हानिकारक आहे ज्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे. पपईमध्ये चिटिनेज एन्झाइम असते. जे लेटेकसह प्रतिक्रिया देऊ शकते. यामुळे, शिंका येण्याबरोबरच श्वासोच्छवासाचा त्रास आणि डोळ्यांच्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो.

Hypoglycemia

4. हायपोग्लाइसेमिया असलेले रुग्ण

ज्यांच्या रक्तातील साखर कमी राहते अशा लोकांनीही पपई खाऊ नये. म्हणजे हायपोग्लाइसेमिया असलेले रुग्ण. कारण त्यात अँटी-हायपोग्लायसेमिक म्हणजेच ग्लुकोज कमी करणारे पदार्थ असतात. ज्यामुळे परिस्थिती धोकादायक बनू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Today's Marathi News Live : मोठी बातमी! वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

SCROLL FOR NEXT