Papaya Face Pack Saam TV
लाईफस्टाईल

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Ruchika Jadhav

पपई हे विविध पोषक तत्वांचं भंडार आहे. यामध्ये अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमीन आणि मिनरल्स सुद्धा असतात. याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पपई आरोग्यासाह आपल्या त्वचेसाठी सुद्धा महत्वाची असते. पपई त्वचेसाठी किती फायदेशी आहे. त्याचे काय परिणाम होतात याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

पपईचा लेप चेहऱ्यावर अप्लाय केल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होते. चेहरा काळपट पडला असेल तर तो कव्हर होतो. चेहऱ्यावर ग्लो येतो. काही महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि अॅक्ने सुद्धा येतात. त्यामुळे महिला विविध कॉस्मेटीक्स चेहऱ्यावर अप्लाय करतात. चेहऱ्यावर कॉस्मेटीक्स अप्लाय केल्याने चेहरा आणखी खराब होतो. यापसून वाचण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर पपई फेसपॅक सुद्धा लावू शकता. पपई फेसपॅक कसा बनवायचा याची माहिती जाणून घेऊ.

पपई आणि मधाचा फेसपॅक

एक पपई छान शिजवून घ्या. त्यात मध मिक्स करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. किमान १५ ते २० मिनिटे तरी पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा.

त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

पपई आणि दही फेसपॅक

पपई आणि दही फेसपॅक सुद्धा चेहऱ्यासाठी चांगला आहे.

सर्वात आधी पपईची पेस्ट घ्या त्यात दही मिक्स करून चेहऱ्यावर अप्लाय करा.

१२ ते १५ मिनिटे पेस्ट चेहऱ्यावर सुकली की चेहरा धुवून घ्या.

पपई आणि तांदूळ

तांदूळ आपल्या चेहऱ्याला पोषण देण्याचे महत्वाचे काम करतात.

पपईचा गर काढून घ्या. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा.

अशा पद्धतीने तुम्ही रामबाण फेसपॅक बनवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT