Paneer Kheer Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Paneer Kheer Recipe: झटपट बनवा पनीर खीर; रेसिपी वाचूनच तोंडाला पाणी सुटेल

Ruchika Jadhav

Kheer Recipe:

आपल्या देशात सर्वत्र खीर ही स्वीट डीश सर्वांना आवडते. वाढदिवस किंवा घरातील मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमात हमखास खीर बनवली जाते. अशात आतापर्यंत तुम्ही तांदूळ, शेवया, रवा, साबुदाणे यांपासून बनलेली खीर खाल्ली असेल. मात्र तुम्ही कधी पनीर खीर खाल्लीये का? बहुतेक व्यक्तींनी या पदार्थाचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. त्यामुळे आज ही गोड पनीर खीर कशी बनवायची याची रेसीपी पाहूयात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या खिरीचा अस्वाद घरच्या घरी घेण्यासाठी याला लागणारे साहित्य आधी जाणून घ्यावे लागले. दिलेल्या माहितीतील साहित्यात तुम्ही एकावेळी ४ व्यक्तींना पुरेल एवढी खीर (Kheer) बनवू शकता. पनीर खीर जास्त गोड नसेल तरी देखील फार चवदार लागते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्ती देखील पनीर खिरीवर ताव मारू शकतात. खीर बनवण्यासाठी तुमच्याकडे अवघे ३० मिनीट असले तरी पुरेसे आहेत.

खीर बनवण्यासाठीचे साहित्य पुढीलप्रमाणे

दूध 1 लिटर (तुमच्या आवडीनुसार 4 कप मोजून घ्या)

चीज 200 ग्रॅम

साखर (Sugar) १/२ कप

वेलची पावडर 1/2 टीस्पून

काजू 2 चमचे चिरलेला

बदाम 2 चमचे चिरलेला

पनीर

रेसिपी वाचा

पनीर खीर बनवण्यासाठी सर्वात आधी चीज छान किसून घ्या आणि बाजूला ठेवा. त्यानंतर एका भांड्यात दूध तापायला ठेवा. पनीर खीर बनवताना फक्त फुल क्रीम दूध वापरावे. दूध तापताना गॅस फास्ट करू नाका संपूर्ण दूध उकळून मंद आचेवर शिजवा.

जर १ लिटर दूध घेतले असेल तर ते उकळून निम्मे म्हणजे जवळजवळ आर्धे होईपर्यंत उकळून घ्या. या दूधात पुढे साखर अॅड करा. नंतर त्यात केशरचे धागे टाकून घ्या. हे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर काही मिनिटे पुन्हा मंद आचेवर एक उकळी काढून घ्या.

पुढे या दूधात किसलेले चीज घाला. तसेच पनीर किसून घ्या आणि तेही यात मिक्स करा. वरून वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घाला. नीट मिक्स करून गॅस बंद करा. तयार झाली तुमची खमंग पनीर खीर. ही खीर तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT