Paneer Bhurji Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Paneer Bhurji Recipe : नाश्ता किंवा जेवणासाठी, झटपट तयार होते पनीर भुर्जी; वाचा मराठमोळी सिंपल रेसिपी

Paneer Bhurji Recipe in Marathi : आज आम्ही तुम्हाला अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पनीर भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

नाश्ता असो किंवा मग जेवण प्रत्येकाला कमी वेळात, झटपट आणि चविष्ट असणारे पदार्थ खावे वाटतात. त्यासाठी तुम्ही पनीर भुर्जी खाऊ शकता. पनीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतं. त्यामुळे नाश्ता किंवा जेवण दोन्हीसाठी तुम्ही पनीर भुर्जी खाऊ शकता.

पनीर भुर्जी इतकी टेस्टी बनते की घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती खावीशी वाटते. मात्र काहींना पनीर भुर्जी हवी तशी बनवता येत नाही. भुर्जीची रेसिपी चुकली की ती कुणालाही खावी वाटत नाही. शिवाय सर्व जेवण वाया जातं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पनीर भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

२५० ग्रॅम पनीर

कांदा - २

टोमॅटो - २

हिरवी मिर्ची - १

अद्रक - १ इंच

हळद

लाल तिखट

धने पावडर

जिरे

कोथिंबीर

मिठ

तेल

कृती

सर्वात आधी पनीर एका बाऊलमध्ये किसून किंवा हाताने चुरून घ्या. पनीर बारीक चुरल्यानंतर कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या. तसेच अद्रक अगदी मस्त खलबत्यात ठेचून घ्या. पुढे एक पॅन घ्या. त्यामध्ये २ चमचे तेल टाकून घ्या. पॅनमध्ये तेल घातल्यावर त्यात जीरे टाका. जिरे चांगले तडतडले की त्यात कढिपत्ता टाकून घ्या.

पुढे या तेलात बारीक चिरलेला कांदा मिक्स करा. कांदा छान परतला की त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची मिक्स करा. हे सर्व देखील तेलात छान परतून घ्या. त्यानंतर यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि धने पावडर सुद्धा मिक्स करा. पुढे यामध्ये बारीक केलेलं पनीर मिक्स करा. पनीर मस्त मिक्स झालं की, सर्व मिश्रणासह अगदी थोडं पाणी मिक्स करून सर्व शिजवून घ्या.

ही पनीर भुर्जी तु्म्ही चपाती, पराठा, नान यांसह जेवणासाठी खाऊ शकता. तसेच सकाळी नाश्ता करताना तुम्ही ब्रेड आणि पाव यासोबत देखील पनीर भुर्जी ताव मारू शकता. ही पनीर भुर्जी जास्त तिखट नसल्याने लहान मुलं सुद्धा अगदी चवीन खातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT