MEANING OF LEFT & RIGHT PALM ITCHING FOR MEN & WOMEN Saam Tv
लाईफस्टाईल

Palm Itching Meaning For Men And Women: स्त्रियांच्या तळहाताला खाज सुटली की पैसा मिळतो तर, पुरूषांबाबत शुभ की अशुभ?

Palm Itching Meaning for Men and Women: हाताला खाज सुटणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांच्या डाव्या किंवा उजव्या तळहाताला खाज येण्यामागील धार्मिक संकेत आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या.

Manasvi Choudhary

आयुष्यात घडणार्‍या चांगल्या- वाईट घटनांचे अनेक संकेत हे आधीच मिळतात. जे शुभ आणि अशुभ दोन्ही असतात. व्यक्तीच्या हातावरून देखील अनेक संकेत मिळतात. घरातील अनेक मोठ्या माणासांकडून तुम्ही देखील ऐकलच असेल की, डाव्या हाताला खाज येणे हे धनलाभाचे संकेत आहे तर उजव्या हाताला खाज येणे हे आर्थिक नुकसानीचे संकेत मानले जाते. यानुसार, पुरूषांच्या आणि महिलांसाठी हे कशाचे संकेत आहे ते सविस्तरपणे जाणून घ्या.

महिलांसाठी शुभ की अशुभ संकेत काय?

शास्त्रानुसार, महिलांच्या डाव्या तळहाताला खाज सुटणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभाचे संकेत मानले जाते.जर महिलांच्या डाव्या तळहाताला खाज येत असेल तर तुम्हाला धनप्राप्ती होणार असल्याचे संकेत मिळतात. याउलट उजव्या तळहाताला खाज सुटणे हे आर्थिक नुकसानीचे कारण मानले जाते. महिलांच्या बोटांना खाज आली तर ते एखादया नवीन उपक्रमाची किंवा नवीन प्रगतीची संधीचे संकेत मानले जाते.

पुरूषांसाठी शुभ की अशुभ संकेत काय?

शास्रानुसार, पुरुषांच्या उजव्या तळहाताला खाज सुटणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते, तर डाव्या तळहाताला खाज सुटणे हे आर्थिक संकट मानले जाते.

हाताची मागची बाजू काय संकेत देते?

हाताच्या मागच्या बाजूला खाज सुटणे म्हणजे अचानक प्रवास, बिझी आणि एखादे काम येते. तसेच मनगटावर खाज सुटणे नवीन नातेसंबंध आणि कामाची संधी मानली जाते.

तळहाताला खाज सुटल्यास काय करावे?

शास्त्रपद्धतीनुसार, जर एखाद्या महिलेच्या डाव्या तळहाताला खाज सुटत असेल, तर तिने त्या दिवशी मोठा खर्च करणे किंवा पैसे उधार देणे टाळावे. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि "ओम श्रीं महालक्ष्म्यै नमः" या मंत्राचा जप करावा. असे म्हटले जाते की यामुळे आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतात. तथापि, जर खाज रोजच येत राहिली, तर तिने त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.

तळहाताल खाज येण्याची वैज्ञानिक कारण

जर एखाद्या वेळेस तळहाताला खाज येत असेल तर कोरडी त्वचा, साबण किंवा केमिकल अॅलर्जी, वारंवार हात धुणे, बुरशीजन्य संसर्गामुळे हा त्रास उद्भवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीनंतर राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीचे सर्व आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

शिंदेसेनेत फूट पडणार? शिंदेसेनेतील आणखी दोन शिंदे कोण?

राष्ट्रवादीची महायुतीत कोंडी? आमदारांना मिळेना निधी, पराभवाची भीती? सुनेत्रा पवारांसमोर आमदारांची कैफियत

बदलीनंतर FDA चं काय होणार? मिशन थांबणार? स्वतः तुकाराम मुंढेंनीच दिलं उत्तर|VIDEO

Diwali Faral Recipe: यंदा दिवाळीत नक्की बनवा 6 पारंपरिक फराळाचे पदार्थ; सणाची मजा येईल दुप्पट!

SCROLL FOR NEXT