Pain Killer Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Pain Killer Side Effects : सावधान! सतत पेन किलर खाताय? शरीरावर होतील हे वाईट परिणाम, जाणून घ्या

Pain Killer : जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Side Effects Of Pain Killer : पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धावपळीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल.

पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते की पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात?

जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना (Pain) असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.

  • रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी (Kidney) संबंधी समस्या होऊ शकतात.

  • रोज घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.

  • अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो. काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.

  • जेवल्यावर 30 मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.

  • पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.

  • जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टरचा (Doctor) सल्ला घ्या.

  • पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.

  • पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT