fat Saam tv
लाईफस्टाईल

औषध घ्या, वजन कमी करा? भारतात 'ओजेम्पिक' औषध लॉन्च?

Ozempic India launch : लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हालाही टाइप 2 मधुमेह आहे का? लठ्ठपणावर मात करून तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...

Suprim Maskar

जगभरात लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चाललीय... अशातच लठ्ठपणा दूर करण्यासाठी भारतात एक औषध लॉन्च करण्यात आलयं... हे औषध नेमकं काय आहे? पाहूयात...

भारतात लॉन्च झालेले ओजेम्पिक औषध हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे जे प्रामुख्याने टाइप -2 मधुमेहाच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. औषधाचे मुख्य संयुग सेमाग्लुटाइड आहे, जे GLP-1 नावाच्या नैसर्गिक संप्रेरकासारखेच कार्य करते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, भूक कमी करण्यात तसंच पचनाच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे भूक कमी होते आणि वजनावरही परिणाम होतो. 1 मिलीग्राम डोसची किंमत भारतात 11 हजार रुपयांपर्यंत आहे...

दुसरीकडे हे औषध जरी लठ्ठपणा कमी करत असलं... तरी या औषधामुळे मळमळ, उलटी, अतिसार, पित्ताशयाशी संबंधित गंभीर आजार उदभवण्याची शक्यताही डॉक्टरर्सकडून वर्तवली जातेय... त्यामुळे ओजेम्पिकसारखे औषध वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.... तसचं लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधाचा वापर करण्याऐवजी योग्य आहार, व्यायाम आणि जंक फूडला नकार... हाच उत्तम आरोग्याचा मंत्र आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chunar Teri Sarke : वाईट शब्द, घाणेरडा डान्स; बॉलिवूडमधील १० अश्लील गाणी, ऐकून येईल चिड

Maternity Leave: मुलांना दत्तक घेतलेल्या महिलांनाही मिळणार मॅटर्निटी लिव्ह, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार; महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT